शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशाध्यक्ष; कोण ठरणार वरचढ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 03:58 IST

कामारेड्डी मतदारसंघात तिरंगी लढत; पण बीआरएसला होईल फायदा, भाजपने दिला ज्येष्ठ उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्ककामारेड्डी (तेलंगणा) : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कामारेड्डी मतदारसंघात तिरंगी लढत आहे. मात्र, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) येथून निवडणूक लढवीत असल्याने आणि पक्षाची संघटनात्मक ताकद तसेच तुलनेने कमकुवत विरोधक यामुळे भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) येथे फायदा होऊ शकतो. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते के. व्यंकट रमन रेड्डी मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढवत आहेत. तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पाच वेळा आमदार असलेले गम्पा गोवर्धन हे या जागेवरून बीआरएसचे आमदार होते; पण राव यांनी कामारेड्डी या जागेवरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या तिरंगी निवडणुकीत कोण विजयी होईल, याबाबत उत्सुकता लागली आहे.

केसीआर यांचे मूळ गाव केसीआर यांच्यासाठी कामारेड्डी विधानसभा मतदारसंघ हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचा जन्म कोनापूर गावात त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी झाला होता. त्यांच्या कुटुंबातील सदस्य अजूनही कामारेड्डीमध्ये राहतात आणि त्यांना भक्कम पाठिंबा देत आहेत.

सिंचनाच्या प्रतीक्षेत शेतकरी

भाजपचे उमेदवार रमन रेड्डी यांनी स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा मुद्दा केला असून कोनापूर गावात प्रचार करताना ते म्हणाले की, केसीआर जिंकले तर तुम्हाला शेवटी गम्पा यांच्याशी संपर्क साधावा लागेल. मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असेन, हे लक्षात ठेवा आणि निर्णय घ्या. 

केसीआर यांच्या विजयामुळे कामरेड्डीतील विकासकामांना चालना मिळेल, अशी आशा परिसरातील अनेकांना आहे. येथील मुख्य समस्या म्हणजे सिंचन साधनांचा अभाव. आपल्या शेतीला पाणी मिळावे, यासाठी शासन काही सिंचन योजना सुरू करेल याची लोकांना प्रतीक्षा आहे.

nकाँग्रेसने माजी मंत्री मोहम्मद अली शब्बीर यांना या जागेऐवजी निजामाबाद शहरी मतदारसंघातून मैदानात उतरविले आहे. nदुसरीकडे भाजपने एका स्थानिक उमेदवाराला मैदानात उतरविले आहे. त्यांनी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत १५ हजार मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.

टॅग्स :Telanganaतेलंगणाtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३