शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मुख्यमंत्री चाैहान यांनी लघुशंका घटनेतील पीडिताचे धुतले पाय; माफीही मागितली, आरती केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 06:46 IST

शिवराज यांनी शाल देत त्याचा सन्मान केला. ते म्हणाले, या घटनेने दु:ख झाले आहे.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : भाजपच्या माथेफिरू नेत्याने एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका केल्यामुळे देशभरातून टीका झाली. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पीडित तरुणाला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून घेत घरामध्ये आणून खुर्चीवर बसवले, त्यानंतर पाय धुतले, आरती केली आणि तिलकही लावले.

शिवराज यांनी शाल देत त्याचा सन्मान केला. ते म्हणाले, या घटनेने दु:ख झाले आहे. मी तुमची माफी मागतो. तुमच्यासारखे लोक माझ्यासाठी देवासारखे आहेत. दुसरीकडे जे झाले ते झाले, असे आदिवासी तरुणाने सांगितले. त्यांनी या तरुणाला ‘सुदामा’ हाक यावेळी मारली आणि म्हणाले की, “दशमत, तू आता माझा मित्र झाला आहेत. यादरम्यान चौहान यांनी त्याच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.आरोपी प्रवेश शुक्ला याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याच्यावर एनएसए लावण्यात आला असून, तो सध्या तुरुंगात आहे.

दोन दलितांना मारहाणमध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील दोन दलित तरुणांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ही घटना मानवतेसाठी लज्जास्पद असल्याचे म्हटले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आरोपींच्या घरावरही बुलडोझर चालवण्यात येणार आहे.

पत्नी म्हणाली पैशाचा मोह नाहीशिवराज सिंह चौहान यांनी पीडितेच्या पत्नी सांगितले की,  तुम्हाला घर घ्यायचे आहे, व्यवसायासाठी मदत करायची आहे. यावर पीडितेच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, आम्हाला पैशाचा मोह नाही, आमचा माणूस आमच्याकडे पाठवून द्या.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश