मुख्यमंत्री केजरीवालांकडे कुठलेही खाते नाही
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
नवी दिल्ली- राजधानीचे आठवे मुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेणारे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी स्वत:कडे एकाही खात्याची जबाबदारी घेतली नसून ते सरकारच्या संपूर्ण कामकाजावर देखरेख ठेवणार आहेत. त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया हे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतील.
मुख्यमंत्री केजरीवालांकडे कुठलेही खाते नाही
नवी दिल्ली- राजधानीचे आठवे मुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेणारे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी स्वत:कडे एकाही खात्याची जबाबदारी घेतली नसून ते सरकारच्या संपूर्ण कामकाजावर देखरेख ठेवणार आहेत. त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया हे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतील.असे आहे खातेवाटपमनीष सिसोदिया- अर्थ आणि योजना, महसूल, सेवा, ऊर्जा, शिक्षण, उच्चशिक्षण, माहिती तंत्रज्ञान, प्रशासकीय सुधारणा, शहर विकास, दक्षता आणि इतर मंत्र्यांकडे नसलेले सर्व विभाग.गोपाल राय- रोजगार, विकास, कामगार, वाहतूक आणि सर्वसामान्य प्रशासकीय विभागसत्येंद्र जैन- आरोग्य, उद्योग, गुरुद्वारा व्यवस्थापन, सिंचन, पूर नियंत्रण, सार्वजनिक बांधकाम विभाग जितेंद्रसिंग तोमर- गृह, कायदा व न्याय, पर्यटन, कला व संस्कृतीअसिम खान- अन्न व नागरी पुरवठा, पर्यावरण व वन आणि निवडणूकसंदीपकुमार- महिला व बाल कल्याण, समाज कल्याण