शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शेतकरी, स्वत:च्या मालकीची कारही नाही!, केसीआर यांच्या कुटुंबाकडे ५९ कोटींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 12:30 IST

राज्यात ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केसीआर यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले.

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आपल्या कुटुंबाची ५९ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यांच्या कुटुंबावर २५ कोटी रुपयांचे कर्ज आहे, तसेच केसीआर यांच्याकडे स्वत:च्या मालकीची कार नसल्याचे तसेच ते शेतकरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्यात ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केसीआर यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी केलेल्या आंदोलनात त्यांच्यावर दाखल झालेल्या नऊ खटले निकालाविना अद्याप प्रलंबित आहेत. आपल्यावर एकही फौजदारी खटला नाही किंवा कोणत्याही खटल्यात शिक्षा सुनावण्यात आली आलेली नाही. (वृत्तसंस्था)

पत्नीकडे ७ कोटींची जंगम मालमत्ताकेसीआर यांच्या पत्नी शोभा यांच्या नावे ७ कोटी तसेच त्यांच्या अविभक्त कुटुंबांकडे ९ कोटींची जंगम मालमत्ता आहे. शोभा यांच्याकडे २.८१ किलोचे सोन्याचे दागिने, हिरे तसेच १.५ कोटी रुपयांच्या अन्य मौल्यवान वस्तू आहेत. केसीआर यांच्या नावे ८.५० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. आयकर परताव्यात दर्शविल्याप्रमाणे केसीआर यांचे ३१ मार्च २०२३ पर्यंतचे उत्पन्न १.६० कोटी रुपये आहे. 

मुलाच्या कुटुंबाकडे ५४ कोटींची संपत्ती केसीआर यांचे पुत्र व बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव व त्यांच्या कुटुंबीयांकडे ५४.२७ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. के. टी. रामाराव यांच्याकडे १०.४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता पत्नी शैलिमा यांच्याकडे २६.४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता, ७.४२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता व ४.५ किलो सोने आहे. 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३