शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचं मन वळविण्यासाठी मुख्यमंत्री चौहान यांचं उपोषण

By admin | Updated: June 10, 2017 14:36 IST

शेतकऱ्यांचं आंदोलन शांत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांची मनं वळविण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे

ऑनलाइन लोकमत

भोपाळ, दि. 10- मध्य प्रदेशामध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. संतप्त शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे मध्य प्रदेश पूर्णपणे अशांत झालं आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन शांत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांची मनं वळविण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाज साधण्यासाठी त्यांनी भोपाळमध्ये उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत राज्यामधील हिंसाचार थांबणार नाही तोपर्यत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धारही मुख्यमंत्री चौहान यांनी केला आहे.  चौहान हे भोपाळमधील दसरा मैदानात लोकांशी थेट संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री दसरा मैदानावर पोहोचले आहेत. मंचावर चौहान यांच्या पत्नी साधना सिंह, ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर, प्रभात झा यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थितीत आहेत.
 
उपोषण सुरू करण्यापूर्वी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचं मत शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केलं आहे. शेतकऱ्यांविषयी आमच्या मनाच आदर आहे. काही लोकांकडून राज्यातील परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न केला जातं आहे, यासाठी लहान मुलांच्या हातात दगडं दिली जातात, असंही ते म्हणाले आहेत. जेव्हा सरकार चर्चेसाठी तयार नसतं, तेव्हा आंदोलन केलं जावं. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असं शिवराजसिंह चौहान त्यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी म्हटलं होतं. शेतकऱ्यांना योग्य भाव देणं हे निश्चित केलं जाईल. आमच्या सरकारचे लक्ष्य हे राज्य आणि राज्यातील जनतेचा विकास करणं आहे, असं स्पष्टिकरण शिवराजसिंह चौहान यांनी दिलं आहे.  
 
शेतकरी संपाला का लागलं हिंसक वळण ?
शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलन  हिंसक झालं. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यासह अनेक वाहनांना आगीच्या हवाली केलं. गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू करण्यासह इंटरनेटवर बंदी घातली आहे. दरम्यान, राज्य सरकारने गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. राज्याच्या मंदसौर जिल्ह्यातील दलौदा येथे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांत चकमक तसेच दगडफेक झाली. एक हजार शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आठ मालमोटारी (ट्रक) आणि दोन दुचाकींना आगीच्या हवाली केले आणि पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दगडफेकही केली.