शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

चिदम्बरम यांनी तिहार तुरुंगात केली लापशीची न्याहारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 07:05 IST

रात्रभर झोप नाही; धार्मिक ग्रंथाचे वाचन

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील आरोपी व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी तिहार कारागृहामध्ये शुक्रवारी सकाळी धार्मिक ग्रंथाचे वाचन केले, तसेच न्याहारीमध्ये लापशी घेतली. मुलगा कार्ती याने चिदम्बरम यांची कारागृहात भेट घेतली.चिदम्बरम यांची या कारागृहात गुरुवारी संध्याकाळी रवानगी करण्यात आली. त्या रात्री त्यांना व्यवस्थित झोप लागली नाही. त्यांना सात क्रमांकाच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणांतील आरोपींना शक्यतो याच कोठडीमध्ये ठेवण्यात येते. चिदम्बरम यांनी शुक्रवारी सकाळी सहा वाजता न्याहारीदरम्यान लापसी, चहा घेतला. त्यानंतर वृत्तपत्रे, धार्मिक ग्रंथाचे वाचन केले. कारागृहात त्यांना कोणत्याही विशेष सुविधा देण्यात आलेल्या नाहीत.

इतर कैद्यांप्रमाणे चिदम्बरम तिहार तुरुंगातील ग्रंथालयात जाऊन वाचन करू शकतात. तसेच विशिष्ट कालावधीसाठी टीव्ही पाहण्याची मुभा कैद्यांना आहे. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती यालाही तिहार कारागृहातील सात क्रमांकाच्या कोठडीमध्ये गेल्या वर्षी बारा दिवस ठेवण्यात आले होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा व अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातील आरोपी रतुल पुरी यांनाही तिहार तुरुंगातच ठेवण्यात आले आहे.कार्ती यांना १० कोटी देण्यास नकारच्आयएनएक्स मीडिया घोटाळा व अन्य प्रकरणांतील आरोपी कार्ती चिदम्बरम यांनी विदेशात जाण्याआधी न्यायालयात भरलेली १० कोटी रुपयांची अनामत रक्कम आणखी तीन महिने परत मिळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले आहे. न्या. दीपक गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा आदेश दिला.च्पी. चिदम्बरम यांच्या विरोधात एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी दिल्ली विशेष न्यायालयाने बेमुदत तहकूब केली आहे. या खटल्याची सुनावणी तहकूब करण्याची सीबीआय व ईडीकडून वारंवार मागणी होत असल्याने न्या. ओ. पी. सैनी यांनी हे पाऊल उचलले आहे.

टॅग्स :chidambaram-pcचिदंबरमP. Chidambaramपी. चिदंबरम