शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

'हिड़मा अभी जिंदा है…', नक्षलवाद्यांचा दावा; आमचा कमांडर अजूनही जिवंत, सर्जिकल स्ट्राईक फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:13 IST

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला नक्षलवाद्यांनी अपयशी ठरवले आहे.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला नक्षलवाद्यांनी अपयशी ठरवले आहे. छत्तीसगडमधील बस्तर, नक्षलग्रस्त भागात झालेला सर्जिकल स्ट्राईक फेल ठरल्याचा दावा माओवाद्यांनी केला आहे. नक्षल कमांडर हिडमा मरण पावला नसून तो अजूनही जिवंत असल्याचं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद्यांनी जारी केलेल्या निवेदनात नक्षल कमांडर हिडमा जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस दलाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

नक्षवाद्यांचा प्रवक्ता समता यांनी जारी केलेल्या निवेदनात माओवादी बटालियन कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार झाल्याची माहिती खोटी असल्याचं म्हटलं आहे. माओवाद्यांनी कथित हवाई हल्ल्याची छायाचित्रे जारी केली आहेत. नक्षलवाद्यांच्या दाव्यानुसार ११ जानेवारी हा छत्तीसगडच्या इतिहासातील आणखी एक काळा दिवस ठरला आहे. सुकमा आणि विजापूरच्या सीमेवरील ठिकाणे बॉम्बफेक, ड्रोन आणि हेलिकॉप्टरद्वारे हवाई हल्ले करण्यात आली. हवाई दल आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडोचा वापर करून सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्यांनी हेलिकॉप्टरमधून अंदाधुंद गोळीबार केला आणि आम्ही चोख प्रत्युत्तर दिले, सहा जवान जखमी झाले आणि सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश हाणून पाडला, असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. 

'पाणी, जंगले कॉर्पोरेट घराण्यांच्या ताब्यात देण्यास सरकार तयार'छत्तीसगड आणि बस्तरमधील नैसर्गिक क्षेत्र कॉर्पोरेट घराण्यांना देण्यासाठी सरकार या घटना घडवत असल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे. लोकांना त्यांच्या जमिनी आणि जंगलातून हुसकावून लावण्याचा सरकारचा डाव आहे. एप्रिल २०२१ आणि एप्रिल २०२२ मध्ये सुरक्षा दलांनी बस्तरमध्ये केलेला हा तिसरा बॉम्बस्फोट असल्याचा दावा माओवाद्यांनी केला आहे. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकमध्ये पीएलजीएचे सदस्य पोटम हांगी मारले गेल्याचं त्यांनी कबुल केलं आहे.

नक्षलवाद्यांचा दावा पोलिसांनी फेटाळलानक्षलवाद्यांचा दावा फेटाळून लावत बस्तर रेंजचे आयजीपी पी सुंदरराज म्हणाले की, नक्षलवादी लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे दावे करत आहेत. छत्तीसगड आणि बस्तरमध्ये नक्षलवाद्यांना पराभूत केलं जात आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही मनोधैर्य खचत आहे. लोकांना भडकवण्याचा कट रचला जात आहे, परंतु सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचे आयजींनी सांगितले आहे.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड