शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण तडफडत होता अन् रुग्णालयाचा स्टाफ पार्टीत व्यस्त; उपचार करण्यास नकार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 17:55 IST

वरिष्ठांनीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली.

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा तडफडत होता, मात्र ओपीडीची वेळ संपली म्हणून कर्मचाऱ्यांनी रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, सर्व कर्मचारी आत वाढदिवसाची पार्टी करत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रुग्णाच्या कुटुंबीयांनी बनवला असून, यातून रुग्णालय व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.

व्हिडिओमध्ये एक महिला कर्मचारी ओपीडीमध्ये बसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तिच्या समोर एक रुग्ण स्ट्रेचरवर तडफडत आहे, पण ती ओपीडीची वेळ संपल्याचे सांगत उपचार करण्यास नकार देते. कुटुंबीयांनी त्या महिला कर्मचाऱ्याला विनंती करुनही तिने ऐकले नाही. रुग्णाच्या कुटुंबीयांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये आपली ड्युटी संपल्याचे सांगून उपचार न करणारे कर्मचारी आपल्या एका सहकाऱ्याचा वाढदिवस साजरा करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांना केक कापायला वेळ आहे, पण रुग्णावर उपचार करण्यास वेळ नाही.

डॉक्टरांनीही जखमींवर उपचार केले नाहीतदरम्यान, दोन जखमींना घेऊन 108 रुग्णवाहिका तेथे पोहोचली. एकाचे डोके फुटले होते, तर दुसऱ्याच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर त्वरीत उपचार करण्यास सांगितले, मात्र वाढदिवसाच्या पार्टीत व्यस्त असलेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्याने उपचार केले नाहीत. त्यांची वाढदिवसाची पार्टी पार पडल्यावर बऱ्याच वेळेनंतर जखमींवर उपचार करण्यात आले.

रुग्णाच्या कुटुंबीयांना या घटनेची संपूर्ण माहिती सिव्हिल सर्जन डॉ. हेमंतकुमार साहू यांना द्यायची असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत असल्याचे सांगून आरएमओकडे तक्रार करण्यास सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडhospitalहॉस्पिटल