शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

जिन्स, टी-शर्ट परिधान करून सरकारी कर्मचाऱ्यांनी ऑफिसला येऊ नये- प्रशासन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 9:52 AM

सरकारी कर्मचाऱ्यांनी जिन्स, टी-शर्ट परिधान करून ऑफिसला येऊ नये, असे फर्मान प्रशासनानं काढलं आहे.

बीजापूरः सरकारी कर्मचाऱ्यांनी जिन्स, टी-शर्ट परिधान करून ऑफिसला येऊ नये, असे फर्मान प्रशासनानं काढलं आहे. छत्तीसगडच्या बीजापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना वाट्टेल तसे कपडे परिधान करून ऑफिसात येण्यास मज्जाव केला आहे. सरकारी कर्मचारी टी-शर्ट, जिन्स आणि आकर्षक कपडे परिधान करून कार्यालयात येऊ शकत नाही, असा आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात स्वतःच्या सभ्यतेला शोभून दिसतील असे कपडे घालावेत.बीजापूरचे जिल्हाधिकारी केडी कुंजम यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा कडक नियम लागू केला आहे. आदेशात म्हटलं आहे की, नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी असे कपडे परिधान केले पाहिजेत, जेणेकरून त्यांची सभ्यता दिसेल. जर या आदेशाचं कोणीही पालन केलं नाही, तर त्या संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे सूतोवाच जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहेत. त्याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही इशारा दिला आहे. तुम्ही गणवेशातच कार्यालयात उपस्थित राहिलं पाहिजे. कर्मचाऱ्यांना एवढा भत्ता मिळत असूनही योग्य कपडे परिधान करून ते कार्यालयात येत नाहीत. त्यासाठी ही सक्ती केली जात असल्याचा खुलासाही जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.