छत्रपती शिवाजी महाराज जयंती - जोड - जोड
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
काँग्रेस सेवादल
छत्रपती शिवाजी महाराज जयंती - जोड - जोड
काँग्रेस सेवादल नागपूर शहर काँग्रेस सेवादलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधीगेट जवळील पुतळ्याला माल्यार्पण करून मानाचा मुजरा देण्यात आला. यावेळी सेवादलाचे प्रमुख रामगोविंद खोब्रागडे, सुलभा नागपूरकर, स्मिता कुंभारे, देवेश गायधने, गोविंद उरकुडे, प्रभूदास तायवाडे, माया घोरपडे, राजकुमारी फोपरे, संतोष गुडपवार, एन. रामचंद्र, सिद्धार्थ ढोले, प्रमिला गोंडाणे, सुनिता शेंडे, आरती गाणार, सतीश तारेकर, सुनील घोरपडे, कैलास चरडे, मच्छिंद्र जीवने, हरिदास डोंगरे आदी उपस्थित होते. अभिनंदन हायस्कूलओमनगर येथील अभिनंदन हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुखदेव ठाकरे प्रमुख अतिथी डॉ. अनिल पांडे, लक्ष्मीकांत कातोरे, डॉ. नरेंद्र भुसारी, रश्मी पाटील उपस्थित होते. यावेळी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनीही महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. विदर्भ पदवीधर एकता मंचमंचचे संयोजक पद्मश्री तांबेकर यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी सतीश भगत, संतोष गोटाफोडे, राजेंद्र अतकरी, सुनील बोरकर, पंकज बांते, गजानन वानखेडे, अमर चकोले, चंदू कामडे, मोहन हजारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी जयंती साजरी करण्यात आली. कुंभारे यांच्या हस्ते महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निशिकांत सुके, अजय रामटेके, रमण जैन, गिरीश जोशी, तहसिलदार भास्कर बांबोर्डे, रोहिणी पाठराबे उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याहस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अप्पर आयुक्त एम.ए.एच. खान, उपआयुक्त अप्पासाहेब धुळाज व इतर अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्तांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. आयुध निर्माणी, अंबाझरीआयुध निर्माणीतील वित्त व लेखा नियंत्रक कार्यालयात कार्यालयाध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सहायक नियंत्रक राकेश मोहन, वरिष्ठ लेखा अधिकारी जे. एम. लभाने उपस्थित होते. महाराजांच्या जीवनावर शिरीष असेरकर यांनी प्रकाश टाकला. महाराजांच्या जीवनकार्यावरील चित्रपट सादर करण्यात आला.