शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केमोविना कर्करोग बरा करणार

By admin | Updated: May 16, 2016 05:04 IST

एक अभिनव तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने येथील ‘इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स’च्या वैज्ञानिकांनी आश्वासक प्रगती केली आहे.

बंगळुरू : अत्यंत क्लेषदायक असे ‘साईड इफेक्ट’ होणाऱ्या केमोथिरपीविना विविध प्रकारचे कर्करोग बरे करण्याचे एक अभिनव तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने येथील ‘इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स’च्या वैज्ञानिकांनी आश्वासक प्रगती केली आहे.या संस्थेच्या ‘सेंटर फॉर नॅनो सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंग’मधील (सीईएनएसई) वैज्ञानिकांच्या चमुने रुग्णाच्या शरिरातील कर्करोगग्रस्त अवयवाच्या बाधित पेशींना अत्यंत सुक्ष्म अशा ‘नॅनो व्हॉयेजर्स’द्वारे थेट औषध पोहोचविण्याचे तंत्र विकसित केले आहे. हे औषधवाहक ‘नॅनो व्हॉयेजर्स’ पाच नॅनोमीटर एवढ्या सुक्ष्म आकाराचे असतात. (एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा एक अब्जावा भाग). हे ‘व्हॉयेजर्स’ कर्करोगरोधी औषधांच्या अणिकणांनी अवंगुंठित असतात. ते हे औषध थेट बाधित पेशींपर्यंत पोहोचवितात. परिणामी कर्करोगग्रस्त पेशी नष्ट होतात व त्यामुळे कर्करोगाचा प्रसार थांबतो.या केंद्राच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, हे तंत्र आम्ही सैद्धांतिकदृष्ट्या विकसित केले आहे. आता या ‘नॅनो व्हॉयेजर्स’व्दारे नेमक्या कोणत्या कर्करोगरोधी औषधाचा वापर करणे सर्वाधिक परिणामकारक ठरेल हे ठरविण्यासाठी आम्ही बंगळुरु येथील ‘किडवई मेमोरियल इन्स्टिट्यूट आॅफ आॅन्कॉलॉजी’मधील कर्करोगतज्ज्ञ आणि काही रेडिएशन तज्ज्ञांच्या मदतीने आणखी काही प्रयोग करणार आहोत.सेंटरचे सहाय्यक प्राध्यापक व या वैज्ञानिक चमुचे प्रमुख प्रा. अंबरिश घोष यांनी सांगितले की, नेमक्या हव्या त्या पेशींपर्यंत ‘नॅनो व्हॉयेजर्स’ पोहोचविण्यात आम्हाला यश आले आहे. ‘नॅनो व्हॉयेजर्स’नी पेशींमध्ये प्रवेश केल्यावर त्यांचे अचूक मॅपिंगही केले. आमच्यासाठी हे मोठे यश आहे. यावरून या ‘नॅनो व्हॉयेजर्स’मार्फत नेमक्या हव्या त्या पेशींपर्यंत औषध पोहोचविणे शक्य आहे, हे सिद्ध झाले आहे.सध्या हे प्रयोग प्रामुख्याने उंदराच्या शरिरातून काढलेल्या अवयवांच्या अंशांवर उपचार करून स्कर्व्हायकल व फुफ्फुसाचा कर्करोग बरा करण्याच्या उद्देशाने केले जात आहेत. हेच प्रयोग जेव्हा जिवंत उंदरावर यशस्वी होतील त्यानंतर त्यांच्या मामशांवर चाचण्या घेण्यात येतील. माणसांवर स्कर्व्हायकल व फुफ्फुसाचा कर्करोग बरा करण्यात यश मिळाले की हाच प्रयोग अन्य प्रकारच्या कर्करोगांसाठी केला जाऊ शकेल. (वृत्तसंस्था)>बाह्य चुंबकीय दिशानिर्देशऔषधांनी अवगुंठित केलेले हे ‘नॅनो व्हॉयेजर्स’ शरीरात टोचल्यानंतर बाहेरून चुंबकीय प्रभावक्षेत्राचा वापर करून ते पूर्वनिधारित पेशींपर्यंत अचूक नेऊन पोहोचविले जातात. हे ‘नॅनो व्हॉयेजर्स’ सिलिकॉन डायोक्साईडचे बनविलेले असतात.आम्ही जेव्हा पाण्यावर प्रयोग केला तेव्हा ‘नॅनो व्हॉयेजर’ व्यवस्थित प्रवाहित झाले. पण रक्तावर प्रयोग करताना रक्तातील लोहामुळे ‘नॅनो व्हॉयेजर’चे क्षरण होत असल्याचे दिसून आले. असे होऊ नये म्हणून याच संस्थेच्या मटेरियल्स रीसर्च सेंटरचे प्रा. श्रीनिवासराव शिवशंकर यांनी विकसित केलेल्या ‘झिंक फेराईट’च्या अत्यंत पातळ पापुद्र्याचे त्यावर आवरण चढविण्यात आले.- प्रा. अंबरिश घोष, सहायक प्राध्यापक, सीईएनएसई