शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतरस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

By admin | Updated: May 13, 2014 20:26 IST

पातूर: शहरातील सिंगर नाला ते स्मशानभूमीपर्यंतच्या शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी पातूर येथील शेतकर्‍यांनी केली असून, या संदर्भात पातूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

पातूर: शहरातील सिंगर नाला ते स्मशानभूमीपर्यंतच्या शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी पातूर येथील शेतकर्‍यांनी केली असून, या संदर्भात पातूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.शहरात सिंगर नाला ते स्मशानभूमीपर्यंत शेतरस्ता असून, या रस्त्याचा उपयोग पातूर तसेच भंडारज परिसरात जिरायत शेती असलेल्या शेतकर्‍यांना शेतात जाण्या-येण्यासह मालाची ने-आण करण्यासाठी होतो. मागील वर्षी या रस्त्याचे काम मंजूर झाले होते; परंतु हे काम रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांद्वारे न करता संबंधित ठेकेदाराने मशीनद्वारे केले. रस्त्यावर भराव टाकून व आजूबाजूच्या शेतातील काळी माती टाकून रस्त्याचे काम थातूरमातूर पद्धतीने करण्यात आले. रस्त्यावर जाडा मुरूम टाकला नाही. दबाईसुद्धा करण्यात आली नाही. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पावसाळ्यात पाण्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकर्‍यांना शेतीच्या कामासाठी, मालाची ने-आण करण्यासाठी या रस्त्यावरून बैलगाडी घेऊन जाणे दूरच, पायी चालणेही अशक्यच झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी पातूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी परशराम उंबरकार, रवी ढोकणे,अजय मालसुरे, उद्धव आवटे, बाळू उगले, मोहन गाडगे, उमेश परमाळे उपस्थित होते.