शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

स्वस्तात तीर्थयात्रा; रेल्वेचा रोजचा खर्च ८३० रुपये

By admin | Updated: May 16, 2016 03:51 IST

विविध तीर्थस्थळांचे दर्शन अत्यंत कमी खर्चात घेता यावे यासाठी यंदाच्या मे महिन्यापासून भारतीय रेल्वेने ‘भारत दर्शन ट्रेन’ सेवा सुरू केली

नवी दिल्ली : भारतातल्या भाविक यात्रेकरूंना देशातल्या विविध तीर्थस्थळांचे दर्शन अत्यंत कमी खर्चात घेता यावे यासाठी यंदाच्या मे महिन्यापासून भारतीय रेल्वेने ‘भारत दर्शन ट्रेन’ सेवा सुरू केली आहे. या यात्रेसाठी प्रत्येक प्रवाशाला दररोज फक्त ८३0 रूपयांचे प्रवास भाडे आकारले जाणार आहे.या ‘भारत दर्शन ट्रेन’ने तूर्तास पूर्व आणि उत्तर भारतातील महत्वाच्या तीर्थस्थळांना भेट देणे यात्रेकरूना शक्य होणार आहे. पुढील महिनाभरात मध्य, पश्चिम व दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्रांसाठीही अशी रेल्वेसेवा सुरु होईल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रौंनी दिली.भारतीय रेल्वेच्या भारत दर्शन योजनेनुसार पहिली ट्रेन ८ मे रोजी चंदिगडहून रवाना झाली असून पुढची ट्रेन २३ मे रोजी सुटणार आहे. प्रत्येकी दहा डब्यांची ही ट्रेन चंदिगडहून दिल्ली, अयोध्या, वाराणसी, गया मार्गे बैद्यनाथधामहून जगन्नाथपुरी मार्गे श्रीगंगासागरला पोहोचणार आहे.भारतातल्या तीर्थस्थळांची बजेट फ्रेंडली यात्रा यात्रेकरूंना यापुढे अतिशय नाममात्र रकमेत करण्याची सुविधा देशातल्या विविध भागात जाणाऱ्या भारत दर्शन ट्रेन्समुळे उपलब्ध होणार आहे. शिर्डी तिरूपतीसह दक्षिण भारत तसेच देशातल्या ७ ज्योतिर्लिंगाना भेट देणाऱ्या यात्रेच्या पॅकेजसोबत तर रस्ता मार्गाने बसेसचा प्रवास, निवास व भोजन या सुविधाही यात्रेकरूंना या पॅकेजमधेच मिळणार आहेत.दि. २७ जूनला चंदिगडहून सुटणारी ‘भारत दर्शन ट्रेन’ दिल्ली मार्गे शिर्डी, तिरूपती, कांचीपूरम, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, म्हैसुर, बंगलुरूला भेट देईल तर ७ ज्योतिर्लिंगाना भेट देणारी ट्रेन चंदिगडहून दिल्लीमार्गे उज्जैन(महांकालेश्वर व ओंकारेश्वर), व्दारका, सोमनाथ, औरंगाबाद व त्र्यंबकेश्वर (नाशिक)ची यात्रा घडवणार आहे. प्रत्येक ट्रेनमधे प्रशिक्षित टूर व्यवस्थापक यात्रेकरूंच्या सेवेत असतील, असेही रेल्वेच्या सूत्रांनी सांगीतले. (विशेष प्रतिनिधी)