शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चातुर्मासाला मुनीश्रींच्या नगरप्रवेशाने प्रारंभ (१)

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

- सूर्यनगरातून काढण्यात आली भव्य शोभायात्रा : मुनीश्री प्रसन्नसागर यांचे प्रवचन

- सूर्यनगरातून काढण्यात आली भव्य शोभायात्रा : मुनीश्री प्रसन्नसागर यांचे प्रवचन
नागपूर : आजपासून चातुर्मासाला प्रारंभ झाला. मुनीश्री प्रसन्नसागर महाराज यांच्या नगरप्रवेशाने आणि महाराजांच्या उपदेशाने भाविकांचा आजचा चातुर्मासाचा प्रथम दिवस पावित्र्याने भारला होता. याप्रसंगी दिगंबर जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संभवनाथ जैन मंदिरात शोभायात्रा आल्यावर मंदिरातर्फे शोभायात्रेचे आणि प्रसन्नसागर महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले. बँडपथक, भजन, कीर्तनादी संकीर्तन करीत यात भाविक सहभागी झाले होते.
शोभायात्रेत हत्ती, घोडे, लेझिम पथक आदींचाही सहभाग होता. लकडगंज येथे शोभायात्रा पोहोचल्यावर जय झांझरी, राजकुमार झांझरी, विजय झांझरी, प्रसाद सोनी कुटुंबातर्फे रथाचे पूजन करण्यात आले. रथाच्या समोर ११ घोडे आणि रथात मुनीश्री प्रसन्नसागर महाराज, मुनीश्री पीयूषसागर गुरुदेव विराजमान होते. यासह पुलक चेतना मंचचे मनोज बंड, निरंजन जैन, कमलकिशोर जैन आदी भाविक रथासोबत होते. संगीत रथ हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. इतवारी परिसरात नगरसेवक आभा बिज्जू पांडे, महापौर प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत महाराजांचे स्वागत करण्यात आले. महाराजांच्या या रथाचे प्रत्येक ठिकाणी भक्तीभावाने स्वागत करण्यात आले. चातुर्मास समितीतर्फे महाराजांचे स्वागत करण्यात आले. उद्योगपती अमितकुमार बडजात्या यांनी दीपप्रज्वलनाने शोभायात्रेला प्रारंभ केला. याप्रसंगी आसाम, गुवाहाटी, आंध्र प्रदेश, बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रातील अनेक भक्तांनी मुनीश्रींना श्रीफळ भेट दिले.
----------------------
२३ जुलै रोजी मुनीश्री प्रसन्नसागर यांचा जन्मदिन
१९ जुलै रोजी पार्श्वप्रभू दिगंबर मोठे जैन मंदिर, इतवारी येथे सकाळी ८ वाजता मंगल प्रवचन आणि २१ जुलैपर्यंत नित्य प्रवचन होणार आहे. २३ जुलै रोजी अंतर्मना मुनीश्री प्रसन्नसागर गुरुदेव यांचा जन्मदिन जैन मंदिर, सदर येथे साजरा करण्यात येणार आहे.