शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उत्खननात प्रथमच सापडले ब्रॉन्झ युगातील रथ व शस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 05:12 IST

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील सुनौली गावात भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) केलेल्या उत्खननात ब्रॉन्झ युगातील (इ.स.पूर्व २००० ते १८००) रथांचे अवशेष प्रथमच सापडले आहेत.

मेरठ : उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील सुनौली गावात भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) केलेल्या उत्खननात ब्रॉन्झ युगातील (इ.स.पूर्व २००० ते १८००) रथांचे अवशेष प्रथमच सापडले आहेत.‘एएसआय’ने गेल्या मार्चपासून यागावात आठ ठिकाणी उत्खनन सुरु केले होते. त्यात रथाच्या अवशेषाखेरीज आठ कबरस्ताने, तीन शवपेटिका, तलवारी, सुरे, कंगवे आणि आभूषणेही सापडली. तीन रथ एकाच ठिकाणी सापडल्याने ही कबरस्ताने शाही घराण्याची असावीत व त्या काळात येथे एखाद्या लढवय्या जमातीचे वास्तव्य असावे, असे संकेत मिळतात. या उत्खननाचे सहसंचालक एस.के. मुंजाल म्हणाले की, ब्रॉन्झ युगात मेसापोटेमिया व ग्रीससंस्कृतीत रथांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. आता येथे त्याच काळातील रथ सापडल्याने येथील संस्कृतीही तेवढीच पुरातन असल्याचे दिसून येते.मुंजाल यांच्या म्हणण्यानुसार येथे सापडलेले पुरातत्वीय अवशेष संशोधनास नवी दिशा देणारे आहेत. याचे कारण असे की, येथे सापडलेल्या शवपेटिकांवर तांब्याच्या पत्र्याचे मुकुटाच्या, फुलांच्या व शिंगांच्या आकाराची नक्षी बसविलेली आहे. यापूर्वी हडप्पा, मोहेन्जो दारो व धोलवारिया (गुजरात) येथील उत्खननातही शवपेटिका सापडल्या होत्या. परंतु त्यांवर तांब्याचे नक्षीकाम नव्हते. येथे अशा नक्षीकामाच्या शवपेटिका सापडणे हे शाही दफनविधीचे द्योतक आहे. अशा प्रकारचे भारतीय उपखंडात सापडलेले हे पहिलेच कबरस्तान आहे. तलवारी, जांबिया, ढाली व शिरस्त्राणे अशी युद्धात वापरली जाणारी आयुधे सापडली यावरून या भागातील लढवय्या जमातीचे वास्तव्य दिसून येते, असे मुंजाल म्हणाले. (वृत्तसंस्था)याच गावात सध्याच्या ठिकाणापासून १२० मीटर अंतरावर सन २००५ मध्ये केलेल्या उत्तखनानतही कबरस्ताने व काही शस्त्रे सापडली होती. ते अवशेष हडप्पा संस्कतीशी मिळते जुळते होते. आता सापडलेले अवशेष वेगळ््या स्वरूपाचे आहेत.येथे नेमकी कोणाची वस्ती होती याची निष्कर्ष काढायला वेळ लागेल, असेही मुंजाल यांचे म्हणणे होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश