शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीआर भरण्याच्या पद्धतीत झाला बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 02:37 IST

अर्जुना, सप्टेंबर २०२० पासूनचे जीएसटीआर ३-बी जीएसटीएनवर दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे

अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-३ बीच्या इनवर्ड आणि आउटवर्ड बाजूच्या डेटा प्रक्रियेत कोणते बदल झाले आहे?कृष्ण : अर्जुना, सप्टेंबर २०२० पासूनचे जीएसटीआर ३-बी जीएसटीएनवर दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. इनवर्ड बाजूस जीएसटीआर २ बी रिकन्साइल करून ते जीएसटीआर ३ बी व जीएसटीआर २-ए मधील आयटीसी सोबत जुळवावे लागेल. आउटवर्ड बाजूस जीएसटीआर-१ची आकडेवारी जीएसटीआर ३ बीमध्ये दिसेल. त्यामुळे कर दायित्वाची जुळवणी शक्य होईल. यामुळे जीएसटीआर ३बी अधिक बरोबर दाखल होईल. याकडे करदात्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.अर्जुन : कृष्णा, आयटीसीचे जीएसटीआर २बी मध्ये, जीएसटीआर २-ए पेक्षा काय वेगळे आहे?कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर २ बी म्हणजे पुरवठादारांकडून जीएसटीआर १, ५ किंवा ६ मध्ये सादर केलेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येक करदात्यासाठी असलेले इनपुट टॅक्स क्रेडिटचे आॅटो ड्राफ्टेड स्टेटमेंट आहे. हा आयटीसीचा सारांश महिन्याच्या १२ तारखेपर्यंत उपलब्ध असेल. जीएसटीआर-२ ए हा कर परतावा आहे. ज्यामध्ये महिनाभरात विविध खरेदीदारांकडून खरेदी केलेल्याची यादी येते. जीएसटीआर २-ए हे दररोजच्या माहितीच्या आधारावर बदलत असेल. मात्र, जीएसटीआर २ बी हे पुरवठादारांच्या क्रियांच्या आधारावर बदलणार नाही.अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर २बी कसे तयार होईल?कृष्ण : अर्जुना, यात पुरवठादारांनी चालू महिन्याच्या ११ तारखेपर्यंत दाखल केलेल्या जीएसटीआर १ मधील सर्व माहिती, कागदपत्रांचा समावेश पुढील महिन्यातील जीएसटीआर २ बीमध्ये होईल. पुरवठादारांनी दाखल केलेल्या जीएसटीआर २ मधील माहिती करदात्याच्या पुढील ओपन जीएसटीआर २बीमध्ये येईल. पुरवठादारांनी दाखल केलेल्या तारखेचा विचार केला जाणार नाही. उदाहरणार्थ, पुरवठादारांनी जर त्यांच्या जुलैच्या रिटर्नमध्ये आयएनव्ही-१ दि. १५ जुलै २०चे बिल दाखल केल्यास ते जीएसटीआर-२ बी मध्ये दिसेल. (१२ आॅगस्ट रोजी काढलेले जीएसटीआर २ बी)अर्जुन : कृष्णा, नवीन जीएसटीआर २-बी ची वैशिष्ट्ये काय आहेत?कृष्ण : अर्जुना, या फॉर्ममध्ये आयसीईजीएटीईमध्ये असलेली आयातीची माहिती १२ सप्टेंबर २०२० नंतर उपलब्ध केली जाईल. आयातीवरील रिव्हर्स चार्ज क्रेडिट सिस्टिमचा भाग नाही. ते करदात्यास जीएसटीआर ३बीच्या टेबल ४ (ए) (२)मध्ये नमूद करावा लागेल. जीएसटीआर ३ बी दाखल करताना करदात्यांनी सुनिश्चित केले पाहिजे की, क्रेडिट दोनदा घेतले गेले नाही. तर, कायद्यानुसार क्रेडिट रिव्हर्स केले आणि आरसीएम आधारावर कर भरला आहे. या मध्ये करदात्यांना मोठा फायदा आहे. त्यांचे क्रेडिट कायद्यानुसार होईल आणि दाखल करण्यापूर्वी जीएसटीआर ३ बी रिकन्साइल होईल.अर्जुन : कृष्णा, आउटवर्ड बाजूस जीएसटीआर ३ बी आणि जीएसटीआर १ जुळवण्याच्या पद्धतीत काय बदल करण्यात आले आहेत?कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर १ करदात्यांनी दाखल केले असल्यास, त्यातील माहिती जीएसटीआर ३-बी मध्ये दिसेल. त्यामुळे आउटवर्ड बाजूचे रिकन्सिलेशन होऊन जाईल. जीएसटीआर ३-बी आणि जीएसटीआर १ मधील चुका कमी होऊन ते रिकन्साइल होईल. दीर्घकाळासाठी हे करदात्यांना उपयुक्त ठरेल.जीएसटीआर दाखल करतानाची काळजीअर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, आता करदात्यांनी क्रेडिट घेताना आणि जीएसटीआर-१ दाखल करताना काळजी घेतली पाहिजे. जीएसटीआर ३ बी दाखल करताना करदात्यांना मदत होणार आहे. आयटीसीच्या जीएसटीआर २ बी आणि जीएसटीआर १ शी रिकन्साईल असेल. एकूणच जीएसटीआर ३ बी दाखल करणे सोपे झाले आहे. त्यामुळे कमीत कमी चुका होतील. हा बदल जेव्हा इनव्हॉईसिंगसाठी लागू होईल, तेव्हा अजून सोपे जाईल.

टॅग्स :Indiaभारत