नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइक्सच्या दिवशी चुकून पाकिस्तानात गेलेले शिपाई चंदू बाबूलाल चव्हाण (२२) यांना लष्करी न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले आहे. त्यांना न्यायालयाने तीन महिन्यांच्या शिक्षेची शिफारस केली आहे. मात्र त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागणार नाही, असे कळते.चव्हाणवर जनरल कोर्ट मार्शल यांच्याकडून खटला चालला. मी अनावधानाने सीमा ओलांडली, असे त्यांनी म्हटल्याचे कळते. जानेवारीत त्यांना पाकने भारताकडे सोपवले. चंदू चव्हाणचे दोन वर्षांचे निवृत्तिवेतनही जप्त झाले. ते पाक सैन्याला शरण गेले होते, असे तेथील लष्कराने म्हटले होते. कमांडर्सच्या वाईट वागणुकीमुळे चव्हाण सीमा ओलांडून आले, असेही इंटर सर्व्हिसेसने म्हटले होते. चव्हाणना दिलेली शिक्षा चुकीची आहे, असे त्यांच्या आजोबांचे म्हणणे आहे. शिक्षेमुळे त्यांच्या सेवेवर परिणाम होणार नाही, असे समजते.
सर्जिकल स्ट्राइक्सच्या दिवशीच चुकून पाकमध्ये घुसलेले चंदू चव्हाण दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 07:12 IST