शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रयान-3 साठी पुढील काही दिवस महत्वाचे, ३ पैकी २ उद्दिष्टे पूर्ण; इस्त्रोने दिली महत्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 08:33 IST

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या चंद्रयान ३ ने यशस्वी लँडिंग केले आहे.

भारताच्या चंद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर  यशस्वी लँडिंग केले. दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्रयान-3 च्या लँडर विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर, रोव्हर प्रज्ञान चंद्रावरील डेटा गोळा करत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो रोव्हरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी शनिवारी महत्वाची माहिती दिली.

इस्रो प्रमुख म्हणाले, "बहुतेक वैज्ञानिक मिशनची उद्दिष्टे आता पूर्ण होणार आहेत. लँडर आणि रोव्हर सर्व कार्यरत आहेत. सर्व वैज्ञानिकांना डेटा खूप चांगला दिसत आहे. येत्आ काही दिवसात आम्ही बराच डेटा गोळा करु शकतो. आम्हाला विज्ञानासाठी खरोखर चांगली प्रगती करण्याची आशा आहे. त्यामुळे आम्ही पुढील १३-१४ दिवसांची वाट पाहत आहोत." 

चंद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग आणि बेंगळुरू येथील इस्रोच्या नियंत्रण केंद्रात पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्याबद्दल इस्रो प्रमुखांनी आनंद व्यक्त केला. चंद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी झालेल्या दौऱ्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत, असंही इस्त्रोचे प्रमुख म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बेंगळुरूला जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. इस्रोच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. देशाच्या तिसर्‍या चंद्र मोहिमेतील चंद्रयान-३ मध्ये सहभागी असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या टीमची त्यांनी भेट घेतली. यासोबतच पीएम मोदींनी महिला शास्त्रज्ञांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. चंद्रयान-३ मोहिमेतील महिला शास्त्रज्ञांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.

तीनपैकी दोन उद्दिष्टे पूर्ण

चंद्रयान-३ ने आपल्या तीनपैकी दोन उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. ट्विटरवर इस्रोच्या दिलेल्या माहितीनुसार, "चंद्रयान-3 मोहिमेच्या तीन उद्दिष्टांपैकी, चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले. रोव्हरने रोटेशनचे प्रात्यक्षिक पूर्ण केले. आता इन-सिटू विज्ञान प्रयोग सुरू आहेत. सर्व पेलोड्स सामान्यपणे कार्यरत आहेत.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रो