बंगळुरू: इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यानं चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला. जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्रोच्या हाती निराशा आली. यानंतर भावूक झालेल्या इस्रो प्रमुख के. सिवन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धीर दिला. भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात असतानाच ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटरपर्यंत पोहोचले, तोपर्यंत त्याचा नियोजित दिशेनं प्रवास सुरळीत सुरू होता. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे लँडरची दिशा आणि ठिकाण कळण्यात अडचणी निर्माण झाल्या. तथापि, पर्यायी योजनेच्या माध्यमातून आकडेवारी मिळविण्यासाठी शास्त्रज्ञ कसोशीने कामाला लागले होते. इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले की, प्राप्त आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येत आहे.
Chandrayaan-2: ...अन् देशाचा श्वासच थांबला; शेवटच्या दोन मिनिटांत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 11:01 IST