चंद्रभान पराते यांची बार्टी प्रकल्प संचालकपदी नियुक्ती
By admin | Updated: September 4, 2015 23:50 IST
चंद्रभान पराते यांची बार्टी प्रकल्प संचालकपदी नियुक्ती
चंद्रभान पराते यांची बार्टी प्रकल्प संचालकपदी नियुक्ती
चंद्रभान पराते यांची बार्टी प्रकल्प संचालकपदी नियुक्ती नागपूर : चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या प्रकल्प संचालकपदी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. शासनाचे उपसचिव माधव काळे यंच्या स्वाक्षरीने शुक्रवारी त्यांच्या प्रतिनियुक्तीबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बार्टीच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्तीसाठी त्यांच्या सेवा साामजिक न्याय विभागाकडे सुपूर्द करण्यात येत असल्याचेही शासन आदेशात म्हटले आहे. त्यांच्या प्रतिनियुक्तीच्या पदावर रुजू होण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर यांनी त्यांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.