शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Chandigarh University Video Leak: "आम्ही इथे सुरक्षित नाही.."; चंडीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींची गर्ल्स हॉस्टेल सोडण्यास सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 14:09 IST

६० विद्यार्थींनीचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल

Chandigarh University Girl Hostel Video Leak: चंडीगड विद्यापीठात तब्बल ६० मुलींचे आंघोळ करताना व्हिडीओ लीक झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर रविवारी प्रकरण उघडकीस आले आणि त्यानंतर मध्यरात्री हॉस्टेलमधील मुलींनी आंदोलन करत विद्यापीठाच्या गेटवर आरडाओरडा केला. घडलेल्या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. या प्रकरणी जी विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणींचे व्हिडीओ शूट करत होती, तिला ताब्यात घेण्यात आले असून हॉस्टेलच्या दोन वॉर्डनना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. पण याच दरम्यान, 'आम्ही येथे सुरक्षित नाही' असं म्हणत अनेक मुलींनी चंडीगड विद्यापीठाचे हॉस्टेल सोडण्यास सुरूवात केली असल्याचे सांगितले जात आहे.

चंडीगड हॉस्टेलमधील अनेक मुली सोमवारी आपले सामान घेऊन सकाळीच घरच्या वाटेवर परतताना दिसल्या. विद्यापीठाने घडलेल्या प्रकारानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंत कॉलेज बंद ठेवले आहेत. विद्यापीठाकडून सुरूवातीला २ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र नंतर, ही सुट्टी २४ तारखेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अहवालाच्या हवाल्यातून टाईम्सनाऊकडून देण्यात आली आहे. व्हिडीओ लीक प्रकरणी शेकडो मुलींनी मोठ्या प्रमाणावर विद्यापीठाच्या आवारात गोंधळ घातला आणि आंदोलन केले. त्यानंतर विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

आम्ही येथे सुरक्षित नाही!

रविवारी प्रचंड हंगामा झाल्यानंतर सोमवारी हॉस्टेलमधील बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले सामान घेऊन हॉस्टेल सोडून जाताना पाहायला मिळाल्या. आम्ही आमच्या मर्जीने हॉस्टेल सोडून सुरक्षेच्या कारणास्तव आमच्या घरी परत जात आहोत, असे जवळपास सर्वच मुलींनी सांगितले. "विद्यापीठाने सुट्टी जाहीर केली आणि आम्ही येथे सुरक्षित नाही. त्यामुळे आम्ही परत घरी जात आहोत. पिडित विद्यार्थिंनींना न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही, कारण त्या लोकांनी अद्यापही या प्रकरणात काहीच कारवाई केलेली नाही. विद्यार्थिनींनी आंदोलन थांबवलेले नाही. आज पुन्हा विद्यार्थिनी आंदोलन करणार आहेत. आम्हाला कोणीही हॉस्टेल सोडून जायला सांगितलेले नाही. पण आम्हाला येथे आता सुरक्षित वाटत नसल्याने आम्ही घरी परत चाललो आहोत", असे हॉस्टेल सोडून जाणाऱ्या एका विद्यार्थिनीने सांगितले.

"आमच्यापैकी कोणालाही अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही. त्यामुळेच हे आंदोलन यापुढेही सुरूच राहिल. चंडीगड विद्यापीठाचे प्रशासन या प्रकरणात काहीही करत नसल्याचे दिसतंय. ते फक्त आम्हाला त्रोटक माहिती देऊन बोळवण करत आहेत. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे असं सांगून विद्यापीठाच्या व्यवस्थापनाचे लोक आम्हा विद्यार्थ्यांना काहीही माहिती देण्यास तयार नाहीत", असेही एका मुलीने सांगितले.

टॅग्स :Punjabपंजाबuniversityविद्यापीठ