शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाला एक कोटी 44 लाख रुपये पगार घेत 16 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याने रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 21:53 IST

कदाचीत तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. भारतातील 16 वर्षाच्या एका विद्यार्थानं वर्षाला एक कोटी 44 लाख रुपयांचा पगार घेत नवा इतिहास रचला आहे.

ठळक मुद्देगेल्या दहा वर्षापासून करत होता ग्राफिक्स डिजाइनिंगमध्ये कामया वर्षी दिली आहे बारावीची परीक्षाट्रेनिंगसाठी ऑगस्टमध्ये जाणार अमेरिकेला

नवी दिल्ली, दि. 31 - कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. भारतातील 16 वर्षाच्या एका विद्यार्थानं वर्षाला एक कोटी 44 लाख रुपयांचा पगार घेत नवा इतिहास रचला आहे. हर्ष‍ित शर्मा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. चंदीगड येथे राहणाऱ्या हर्षितने सरकारी मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूलमधून यावर्षी बारावीची परीक्षा दिली आहे. ऑगस्टमध्ये तो ट्रेनिंगसाठी अमेरिकेला जाणार आहे. इंटरनेट जायंट गूगलने हर्ष‍ित शर्मा आयकॉन डिजाइनिंगसाठी सिलेक्ट केलं आहे. गूगलच्या या स्पेशल प्रोग्रामसाठी हर्ष‍ित एक वर्षाची ट्रेनिंग दिली जाणार आहे. ट्रेनिंग दरम्यान त्याला प्रत्येक महिन्याला चार लाख रुपये पगार दिला जाणार आहे. ट्रेनिंग पूर्ण होताच हर्ष‍ितचा पगार 12 लाख रुपये प्रति महिना होणार आहे.इंटरनेट जायंट गूगलने हर्षितची निवड केल्यानंतर त्याच्या कुटुंबियामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी माध्यामांशी बोलताना हर्षित म्हणाला, गुगलने जॉबची ऑफर दिल्यानंतर मला पहिल्यांदा विश्वास बसला नाही. माझी 12 वी ची परिक्षा झाल्यानंतर मी ऑनलाइन जॉब सर्च करत होतो. मे मध्ये मी गुगलच्या पदासाठी अप्लाय केलं होतं. त्याचवेळी मी ऑनलाइन मुलाखतही दिली होती. गेल्या दहा वर्षापासून मला ग्राफिक्स डिजाइनिंगमध्ये आवड होती. मुलाखतीनंतर ज्यावेळी त्यांनी माझ्या कामाबातचा डाटा मागवला त्यावेळी मी जे पोस्टर डिझाईन केलं ते त्यांना पाठवलं होतं. त्यावरच मला ही संधी मिळाली आहे. गूगलने ऑगस्टमध्ये ज्वॉइन करण्यास सांगितलं आहे.हर्ष‍ितचे आई आणि वडिल हे शिक्षक आहेत. तर लहान भाऊ 10 वी मध्ये शिकत आहे. हर्ष‍ितने आपलं शिक्षण काकांकडे राहून पुर्ण केलं आहे. गेल्या वर्षी हर्ष‍ितला प्रधानमंत्री डिजिटल इंडिया स्कीमच्या अंतर्गत सात हजार रुपयांचं बक्षिस मिळालं आहे.