शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 10:32 IST

चंदीगडच्या दोन नाईट क्लबजवळ मंगळवारी पहाटे स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

चंदीगडच्या दोन नाईट क्लबजवळ मंगळवारी पहाटे स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. रॅपर बादशाहचा हा नाईट क्लब असल्याचं म्हटलं जात आहे. हे स्फोट देशी बनावटीच्या बॉम्बच्या साह्याने करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक घटनास्थळी पोहोचणार आहे.

दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी सेक्टर २६ मध्ये असलेल्या दोन नाईट क्लबजवळ संशयित स्फोटकं फेकल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा हल्ला करण्याला. हे अत्यंत कमी क्षमतेचे स्फोट असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.

ज्या क्लबमध्ये हा स्फोट झाला तो रॅपर बादशाहच्या मालकीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेच्या व्हिडिओमध्ये क्लबच्या तुटलेल्या खिडक्या दिसत आहेत. देशी बनावटीचे बॉम्ब खंडणीच्या उद्देशाने फेकण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र तरीही पोलीस या हल्ल्यामागील हेतू तपासत आहेत. चंदीगड पोलीस फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Blastस्फोट