शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

नीट-यूजीची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या व्यवहारात २०० ते ३०० कोटींच्या उलाढालीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 09:46 IST

परीक्षा माफियाचा एका नियतकालिकाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दावा

नवी दिल्ली: बिहार लोकसेवा आयोगाने शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचे तसेच ओडिशात ज्युनिअर इंजिनिअर पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या विशाल चौरसिया यानेच नीट-यूजीचीही प्रश्नपत्रिका फोडली असण्याचीशक्यता आहे असा दावा बिजेंदर गुप्ता याने केला आहे. एका नियतकालिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांबद्दल सांगितले की, 'वो जेल जायेंगे, फिर बेल और फिर शुरू होगा खेल.' नीट-यूजीची प्रश्नपत्रिका फोडून ती ७०० विद्यार्थ्यांना देण्यात येणार होती.

त्यातून सुमारे २०० ते ३०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता होती असाही दावा गुप्ता याने केला. बिजेंदर गुप्ता याने याआधी काही  परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडण्याच्या गुन्ह्यांत सहभागी होता. त्याला पोलिसांनी दोनदा अटक केली होती. त्याने सांगितले की, नीट-यूजीची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणातील सूत्रधार संजीव मुखिया बेपत्ता असून तो कदाचित पोलिसांच्या हाती लागणार नाही. या प्रकरणात बिहार पोलिसांच्या ईओयूचा तपास योग्य दिशेने सुरू होता. स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका जिथे छापल्या जातात त्या सरकारी मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांशी संधान बांधून तसेच या परीक्षा यंत्रणेतील काही लोकांना हाताशी धरण्यात येते. मग प्रश्नपत्रिका फोडल्या जातात. परीक्षा यंत्रणेतील गैरव्यवहारांमुळे काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपन्याही निविदा प्रक्रियेमध्ये चुकीच्या गोष्टी घडवून आणण्यास मागेपुढे पाहात नाहीत. (वृत्तसंस्था)

या'मुळे जावे लागले तुरुंगातबिजेंदर गुप्ता याने सांगितले की, प्रश्नपत्रिका फोडण्यामध्ये कुख्यात असलेला एक गुंड उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी आहे. त्याचा साथीदार म्हणून मी काम केले होते. एका उमेदवाराला आम्ही प्रश्नपत्रिका फोडून नंतर नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली. या प्रकरणात आम्हाला तुरुंगात जावे लागले होते. आता हा गुंड उत्तर प्रदेशमध्ये आमदार आहे अशी माहिती ब्रिजेंद्र गुप्ता याने दिली.

मुखियावर ३० कोटींचे कर्ज परीक्षा माफिया गुप्ता याने दावा केला की, बिहारमधील प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणाचा सूत्रधार संजीव मुखिया हा गेल्या १० वर्षापासून कर्जात बुडालेला आहे. त्याच्यावर सुमारे ३० कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र प्रश्नपत्रिका फोडण्याचे गुन्हे तो करतच राहिला. शिक्षक भरतीसाठी बिहार लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याबद्दल संजीव मुखियाचा मुलगा शिव याला याआधीच अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :BiharबिहारEducation Sectorशिक्षण क्षेत्र