शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात ताकदवान, भ्रष्ट शक्तीला आव्हान; केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 07:25 IST

न्यायालयात ज्या पद्धतीने त्यांनी बाजू मांडली त्यासाठी हिंमत लागते. अशाच पद्धतीने आमच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी इंग्रजांचा सामना केला होता, असे सुनीता म्हणाल्या.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील सर्वात ताकदवान, भ्रष्ट आणि हुकूमशाहीवादी शक्तींना आव्हान दिले आहे, अशा शब्दात ‘केजरीवाल को आशीर्वाद’ या मोहिमेची घोषणा करताना  सुनीता केजरीवाल यांनी भाजपवर हल्ला चढविला.केजरीवाल खरे देशभक्त आहेत. न्यायालयात ज्या पद्धतीने त्यांनी बाजू मांडली त्यासाठी हिंमत लागते. अशाच पद्धतीने आमच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी इंग्रजांचा सामना केला होता, असे सुनीता म्हणाल्या. केजरीवाल यांच्या लढाईत  सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.

आता संयुक्त राष्ट्रसंघाचीही टिप्पणी केजरीवाल यांना करण्यात आलेल्या अटकेच्या मुद्यावरून आता जर्मनी आणि अमेरिकेपाठोपाठ संयुक्त  राष्ट्रसंघानेही टिप्पणी केली आहे.भारत आणि अन्य देशांमध्ये प्रत्येकाचे अधिकार सुरक्षित राहून प्रत्येकाला स्वतंत्र आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करता येईल, अशी आशा केजरीवाल यांची अटक आणि काँग्रेसची बँक खाती गोठविण्याच्या मुद्यावर बोलताना संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. केजरीवाल यांच्या संबंधात केलेल्या जर्मनी आणि अमेरिकेच्या टिप्पणीवर भारताने तीव्र आक्षेप नोंदवत भारतातील घडामोडींवर नाक खुपसू नये असे म्हटले होते.

‘राबडी देवींप्रमाणेच तयारीत आहेत’केजरीवाल यांनी पक्षातील आपले सहकारी सोडून दिले असून आता सौ. केजरीवाल राबडीदेवींप्रमाणे मुख्यमंत्रिपद सांभाळण्यासाठी सज्ज होत असताना दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली आहे. सुनीता केजरीवाल यांनी गेल्या सात दिवसात केलेल्या तिसऱ्या आभासी संबोधनावर ते भाष्य करीत होते.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल