शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सेक्सटाॅर्शन, फ्राॅड काॅल्सपासून तुमचे रक्षण करणार ‘चक्षू’; सरकारने लाॅंच केली नवी यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:01 IST

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी ‘डिजिटल इंटेलिजन्स’ आणि ‘चक्षू’ असे दाेन प्लॅटफाॅर्म लाॅंच केले. संचार सारथीच्या पाेर्टलवर ‘चक्षू’ची लिंक आहे. तिथे लाॅगिन केल्यानंतर तक्रार दाखल करता येईल.

नवी दिल्ली : देशात दरराेज हजाराे लाेकांची लाखाे रुपयांनी सायबर भामटे फसवणूक करतात. बनावट काॅल, सेक्सटाॅर्शन, एसएमएस किंवा व्हाॅट्सॲप, टेलिग्राम यासारख्या ॲप्सवरुन जाळे टाकले जाते. अशा गुन्हेगारांना झटका देण्याची तयारी सरकारने केली आहे. स्पॅम आणि फ्राॅड काॅल्सची माहिती देण्यासाठी एक नवी यंत्रणा सुरू केली आहे. या यंत्रणेला ‘चक्षू’ असे नाव दिले आहे. 

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी ‘डिजिटल इंटेलिजन्स’ आणि ‘चक्षू’ असे दाेन प्लॅटफाॅर्म लाॅंच केले. संचार सारथीच्या पाेर्टलवर ‘चक्षू’ची लिंक आहे. तिथे लाॅगिन केल्यानंतर तक्रार दाखल करता येईल.

अशी हाेईल कारवाई -- चक्षूवरुन प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे तपास करण्यात येईल. गुन्ह्याशी संबंधित लाेकांना पकडण्यात येईल.- स्पॅम काॅल करणारे व इतर संशयास्पद क्रमांक बंद केले जातील. यामुळे सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळेल.

डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफाॅर्म -यामाध्यमातून बॅंका, साेशल मीडिया तसेच इतर संस्थांना सायबर गुन्हेगारांच्या माहितीचे आदानप्रदान करता येते. फसवणूक झाल्यास याद्वारे तत्काळ माहिती देता येते. रिअल टाईम माहितीचे आदानप्रदान झाल्यामुळे फसवणूक राेखता येईल, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.५९लाख क्रमांक आतापर्यंत संचार सारथी पाेर्टलवर केलेल्या तक्रारीनंतर बंद करण्यात आले आहेत.१०लाखांपेक्षा जास्त बॅंक खाती आणि पेमेंट वाॅलेट गाेठविण्यात आले आहेत.१,००० काेट रुपयांपर्यंतची रक्कम फसवणुकीपासून वाचविण्यात आली आहे.

या आहेत श्रेणी -सेक्सटाॅर्शनचे काॅल किंवा मेसेज, सरकारी अधिकारी किंवा त्यांचे नातेवाई असल्याचे भासवून काॅल करणे, बनावट काॅल सेंटरचे काॅल्स.बॅंक, विज, गॅस, विमा इत्यादींसाठी सतत येणारे काॅल्स.राेबाेटिक किंवा सतत करण्यात येणारे काॅल्स.ऑनलाईन नाेकरी, लाॅटरी, भेट, लाेन ऑफर इत्यादींसाठी येणारे बनावट काॅल्स.संशयास्पद वेबसाईटची लिंक असलेले मेसेजेस.इतर संशयास्पद फ्राॅड.

‘चक्षू’कडे करा तक्रारफ्राॅड, स्पॅम किंवा सेक्सटाॅर्शन यासारख्या काॅल्सची तक्रार ‘चक्षू’च्या माध्यमातून करता येईल. नागरिकांना आलेले काॅल किंवा मेसेजेसचे स्क्रीनशाॅट अपलाेड करता येतील. संबंधित काॅल किंवा मेसेजची तारीख, वेळ व इतर माहिती द्यावी लागेल.  

टॅग्स :fraudधोकेबाजी