शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

बीसीए, बीएमएस, बीबीएसाठी पुढच्या वर्षापासून सीईटी? स्वतंत्रपणे तयारी करावी लागणार!

By रेश्मा शिवडेकर | Updated: January 10, 2024 05:51 IST

नुकताच व्यावसायिक म्हणून दर्जा मिळालेल्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CET

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बीसीए, बीएमएस, बीबीए या पारंपरिक महाविद्यालयांमध्ये चालविल्या जाणाऱ्या आणि नुकताच व्यावसायिक म्हणून दर्जा मिळालेल्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लवकरच ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ (सीईटी) द्यावी लागणार आहे.

‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) केलेल्या सूचनेनुसार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून या संदर्भात राज्याच्या सीईटी सेलकडे विचारणा करण्यात येणार आहे. तसेच, या अभ्यासक्रमांच्या शुल्क निश्चितीसाठीही शुल्क नियमन प्राधिकरणाकडे (एफआरए) प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला सीईटी सेलने मान्यता दिल्यास २०२५ पासून बीसीए, बीएमएस, बीबीएचे प्रवेश सीईटीच्या माध्यमातून घेतले जातील, अशी माहिती विभागातील सूत्रांनी दिली.

या अभ्यासक्रमांचे प्रवेश केवळ बारावीच्या गुणांआधारे होतात, तर शुल्क विद्यापीठ मंजूर करते; परंतु यूजीसीने ८ जानेवारीला पत्र लिहून या अभ्यासक्रमांचे ‘एआयसीटीई’ कायद्यानुसार नियमन करावे, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाला आणि कुलगुरूंना दिल्या आहेत. या अभ्यासक्रमांना एआयसीटीईची मार्गदर्शक तत्त्वे लागू राहतील, असे यूजीसीने पत्रात नमूद केले आहे. यानुसार पुढील कारवाई करावी लागणार आहे, असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आतापर्यंत संलग्नित विद्यापीठांकडून बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए), बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) या अभ्यासक्रमांचे नियमन करण्यात येत होते. मात्र ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद’ (एआयसीटीई) या केंद्रीय नियमन संस्थेने या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा देत नोव्हेंबर, २०२३ मध्ये आपल्या कक्षेत घेतले.

त्यामुळे या अभ्यासक्रमांचे नियमन एआयसीटीईला इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीच्या माध्यमातून आणि शुल्क ‘फी रेग्युलेशन अथॉरिटी’च्या (एफआरए) माध्यमातून निश्चित होणे आवश्यक आहे.

स्वतंत्रपणे तयारी करावी लागणार!

सीईटीकरिता विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे तयारी करावी लागणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयात सीईटीची तयारी करून घेतली जात नाही. त्यामुळे येत्या काळात या सीईटीसाठी क्लासेसचे पेव फुटणार आहे.

७३ हजार प्रवेश

हे तीन अभ्यासक्रम खूप लोकप्रिय असून विनाअनुदानित तत्त्वावर चालविले जातात. २०२१ साली राज्यभरातून तब्बल ७३ हजार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. त्यात मुंबईतील १४,३६३ आणि पुण्यातील १५,८०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :examपरीक्षा