शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी देणग्यांबाबत केंद्राचा कडक पवित्रा; सात हजार संस्थांचे परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 06:09 IST

सर्वाधिक संस्था महाराष्ट्र-तामिळनाडूमध्ये

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतातील संस्थांना मिळणाऱ्या परदेशी देणग्यांबाबतचे नियम केंद्रीय गृहखात्याने अधिक कडक केले. काही संस्थांना परदेशातून पाण्यासारखा पैसा मिळतो. ही स्थिती लक्षात घेता, परदेशी देणग्या नियमन कायद्याद्वारे (एफसीआरए) दिलेल्यापैकी सात हजार परवाने रद्द करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू या दोन राज्यांत रद्द परवान्यांची संख्या सर्वाधिक आहे. 

देशात असंतोष निर्माण करण्यासाठी परदेशातून स्वयंसेवी संस्थांना मोठ्या देणग्या पाठविल्या जातात, असे आढळून आले होते. याला चाप लावण्यासाठी केंद्रीय गृहखात्याने कडक पवित्रा घेतला. 

अशा संस्थांच्या कारभारात त्रुटी आढळल्याने गेल्या वर्षी तामिळनाडूत ७५५ व महाराष्ट्रात ७३४ एफसीआरए परवाने रद्द केले. उत्तर प्रदेशात ६३५, आंध्र प्रदेशमध्ये ६२२, पश्चिम बंगालमध्ये ६११, ओडिशात ४१७, बिहारमध्ये ४४१ एफसीआरए परवाने रद्द केले. केंद्रीय गृहखात्याने इतर खात्यांशी चर्चा करून अन्य राज्यांतही अशी कारवाई केली आहे. 

२२ हजार संस्थांना मिळतात परदेशी देणग्याn परदेशी देणग्या मिळणाऱ्या २२,७६२ संस्थांची नोंद आहे. ही आकडेवारी डिसेंबर २०२१ पर्यंतची आहे. यांनी परवान्याचे नूतनीकरण करणे अपेक्षित होते. n मात्र, त्यासाठी अर्ज न करणाऱ्या ऑक्सफॅम इंडिया, ऑक्सफॅम इंडिया ट्रस्ट, जामिया मिलिया इस्लामिया, दी इंडियन मेडिकल असोसिएशन, दी लेप्रसी मिशन, दी ट्यूबरक्युलोसिस असोसिएशन ऑफ इंडिया, दी इंदिरा गांधी सेंटर फॉर आर्टस्, दी इस्लामिक कल्चरल सेंटर, दी राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आदी संस्थांचे एफसीआरए परवाने रद्द केले आहेत. 

११७ संस्थांना एफसीआरए लागू नाहीसंयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटना, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही सेवाभावी संस्था अशा ११७ संघटनांची यादी केंद्र सरकारने जारी केली आहे. या संघटनांनी भारतातील संस्थांना दिलेल्या देणग्यांचा एफसीआरए कायद्याच्या कक्षेत समावेश केलेला नाही.