शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

कोरोना लसींच्या दुष्परिणामांची माहिती जाहीर करण्यास केंद्राची टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:28 IST

सध्या देशात दररोज ३० लाखांंहून अधिक लोकांना कोरोना लस दिली जात असून, लवकरच ४० लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून-जुलैपर्यंत देशातील ३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्टही कदाचित पूर्ण होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना वाटते. 

हरिश गुप्ता - 

नवी दिल्ली : भारत चार कोटी लोकांना लस देण्याच्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जलदगतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे, हेही अत्यंत कौतुकास्पद आहे. मात्र कोरोना लसीमुळे झालेल्या दुष्परिणामांच्या घटनांची सविस्तर माहिती जाहीर करणे केंद्र सरकार टाळत असल्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  (The Centre's refusal to disclose information on the side effects of the corona vaccine)सध्या देशात दररोज ३० लाखांंहून अधिक लोकांना कोरोना लस दिली जात असून, लवकरच ४० लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून-जुलैपर्यंत देशातील ३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्टही कदाचित पूर्ण होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना वाटते. ६० वर्षे वयावरील सर्व व्यक्ती तसेच एकापेक्षा जास्त व्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील व्यक्तींनी ही कोरोना लस घ्यायला हवी, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या व अन्य दुष्परिणाम होतात, असे निदर्शनास आल्यानंतर युरोपातील १२ देशांनी या लसीचा वापर स्थगित केला. मात्र भारतात लसीकरण मोहिमेत कोविशिल्डचा वापर अद्यापही कायम ठेवला आहे.  कोरोना लसीच्या दुष्परिणामांमुळे ७० जणांचा मृत्यू झाला आहे, तर दुष्परिणाम झालेल्या २०० पैकी ९० जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये नुकतीच झळकली होती. मात्र यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारने अद्याप प्रसिद्ध केलेली नाही.लसीकरणावर सरकारचे बारीक लक्ष -कोरोना साथीसंदर्भात केंद्र सरकारने नेमलेल्या कृती दलाचे सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, लसीकरणामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिनचे कोणावर दुष्परिणाम होतात का, याकडे केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे. यासंदर्भातील काही गंभीर प्रकरणे निदर्शनास आली, तर त्याची माहिती सर्वांना दिली जाईल. कोवॅक्सिन व कोविशिल्ड या लसी अत्यंत सुरक्षित असून, त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असे केंद्र सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. कोरोना लसीचे ६.५ टक्के डोस वाया -देशात कोरोना लसीचे ६.५ टक्के डोस वाया जात आहेत. उपलब्ध डोसचा अधिकाधिक वापर करण्यात यावा, असे केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे. कोरोना लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण आंध्र प्रदेशमध्ये ११.६ टक्के व तेलंगणात १७.६ टक्के आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारmedicineऔषधं