शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

देशात १०० फूड टेस्टिंग लॅब उघडणार, खाद्य निर्यातीला चालना मिळणार; चिराग पासवान यांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:31 IST

प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत भारताला अग्रगण्य देश बनवा आणि विकसित भारताच्या दिशेने योगदान द्या, असे चिराग पासवान म्हणाले.

नवी दिल्ली : चवीला सीमा लागत नाहीत. भारतीय पाककृतींमध्ये सीमा ओलांडण्याची ताकद आहे. आम्ही जगभरात आपली शेती आणि खाद्य निर्यात वाढवण्याच्या विचारांसह पुढे जात आहोत, असे केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले. इंडस फूड २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

प्रक्रिया केलेले अन्न हे आपले भविष्य आहे. त्यांची वाढती मागणीच विकासासाठी प्रचंड शक्यता निर्माण करते. त्यामुळे तुमच्या जेवणाच्या विविध चवी जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जा आणि भारताच्या अनोख्या पाककृतींना जगातील अॅम्बेसिडर बनवा. प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत भारताला अग्रगण्य देश बनवा आणि विकसित भारताच्या दिशेने योगदान द्या, असे चिराग पासवान म्हणाले.

अन्न सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही निर्यातीला प्रोत्साहन देत १०० नवीन अन्न चाचणी प्रयोगशाळा (फूड टेस्टिंग लॅब) उघडणार आहोत. गेल्या काही वर्षांत, इंड्स फूड हे भारतातील सर्वोत्तम आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त व्यापार प्रदर्शनांपैकी एक म्हणून उदयास आले आहे, ज्यामुळे एफ अँड बी क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे चिराग पासवान यांनी सांगितले.

प्रक्रिया केलेल्या अन्नाची मागणी अनेक पटींनी वाढेल - चिरागबदलत्या जीवनशैलीमुळे आणि बदलत्या कुटुंब रचनेमुळे प्रक्रिया केलेल्या अन्नाची मागणी अनेक पटींनी वाढेल आणि भविष्यातील हे लक्ष्य आहे. कारण त्यात वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे, असे चिराग पासवान म्हणाले. दरम्यान, या तीन दिवसांच्या इंडस फूड २०२५ कार्यक्रमात ३० देशांतील २३०० हून अधिक प्रदर्शक आणि ७५०० आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होत आहेत. 

सर्व तयार अन्न उत्पादने निर्यात करणार - बाबा रामदेवया कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बाबा रामदेव देखील उपस्थित होते. ते म्हणाले की, प्रयागराज महाकुंभाच्या आधी हा 'आहार कुंभ' आहे. आम्ही जगभरात भारताचे विचार, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीची विविधता प्रदर्शित करत आहोत आणि त्याचे कौतुक केले जात आहे. तसेच, आम्ही 'फार्म टू फ्रीज' ही एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. यामध्ये आम्ही सर्व तयार अन्न उत्पादने निर्यात करणार आहेत. भारतातील आहार, विचार आणि वर्तनामुळे जगभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे बाबा रामदेव म्हणाले.

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानfoodअन्नBaba Ramdevरामदेव बाबा