शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

PMGKAY : 'पीएम गरीब कल्याण अन्न योजने'चा कालावधी वाढवला, आता मार्च 2022 पर्यंत मिळेल मोफत रेशन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 16:18 IST

PMGKAY : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत  (NFSA) 80 कोटी रेशन कार्डधारकांना मोफत रेशन पुरवठा केला जातो.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (PM Garib Kalyan Anna Yojana) मोफत रेशन वाटप होळीच्या पुढेही वाढवण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) शनिवारी ही माहिती दिली. पीएमओने जारी केलेल्या निवेदनात पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, "या कोरोनाच्या काळात आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे की, कोणीही गरीब उपाशी राहू नये. त्यामुळे सध्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशनची मोहीम होळीच्या पुढेही वाढवण्यात आली आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenda Modi) यांच्या अध्यक्षतेखाली 24 नोव्हेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKAY) मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली, त्यानुसार या योजनेतील लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळेल.

अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशनप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 करोडहून अधिक लोकांना दरमहा 5 किलो मोफत गहू/तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला 1 किलो मोफत संपूर्ण हरभरा दिला जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत  (NFSA) 80 कोटी रेशन कार्डधारकांना मोफत रेशन पुरवठा केला जातो. लाभार्थ्यांना रेशन दुकानातून अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशन दिले जाते.

कोरोना संकट काळात योजनेची घोषणाकोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा करण्यात आली. सुरुवातीला, ही योजना एप्रिल-जून 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर कोरोना संकट कायम राहिल्याने ती आणखी पाच महिन्यांसाठी (जुलै-नोव्हेंबर 2020) वाढवण्यात आली होती.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा एकदा दोन महिन्यांसाठी (मे-जून 2021) लागू करण्यात आली आणि नंतर पाच महिन्यांसाठी (जुलै-नोव्हेंबर 2021) वाढवण्यात आली. आता पुन्हा ही योजना मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी