शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 22:41 IST

आधार प्राधिकरणाने या वेबसाइट्सविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

नवी दिल्ली : आधार कार्ड आणि पॅन कार्डचा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स केंद्र सरकारने ब्लॉक केल्या आहेत. या वेबसाइट्स स्टार हेल्थचा लीक झालेला डेटा आपल्या वेबसाइट्सवर दाखवत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर आधार प्राधिकरणाने या वेबसाइट्सविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अलीकडेच, स्टार हेल्थच्या ३ कोटींहून अधिक लोकांचा वैयक्तिक डेटा लीक झाला आहे. 

स्टार हेल्थने हॅकर, टेलिग्राम आणि त्यात सामील असलेल्या इतरांविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. डेटा लीक थांबवणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण ते सहजपणे दुसऱ्या वेबसाइटवर अपलोड केले जाऊ शकते. तसेच,  VPN चा वापर करून ते पाहता येते. डेटा इतर चॅटबॉट्स आणि वेबसाइट्समध्ये प्रविष्ट केला जाऊ शकतो. नवीन डेटा संरक्षण कायदा अद्याप लागू झालेला नाही.

सरकारचे म्हणणे काय?सुरक्षित इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. काही वेबसाइट्स देशातील नागरिकांचा आधार आणि पॅन कार्ड डेटा लीक करत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सरकार सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देते. या संदर्भात या वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

वेबसाइट्सवर काय आहे आरोप?या वेबसाइट्सवर देशातील नागरिकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड डेटा लीक केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. डेटा लीकच्या या घटनेने लोकांची चिंता वाढली आहे.

हॅकर्सच्या निशाण्यावर भारतीय टेलिकॉम युजर्सया वर्षी जानेवारीमध्ये असे समोर आले होते की, ७५ कोटी भारतीय टेलिकॉम युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना या प्रणालीचे ऑडिट करण्यास सांगितले होते. यामागे हॅकर्सकडे युजर्सचे फोन नंबर आणि आधार कार्ड यांसारख्या डिटेल्स असल्याचे समोर आले आहे.

सायबर सुरक्षा फर्म दावा काय होता?CloudSEK (सायबर सुरक्षा फर्म) ने दावा केला होता की, हॅकर्सच्या एका गटाने भारतीय मोबाइल नेटवर्क ग्राहकांचा एक मोठा डेटाबेस विक्रीसाठी डार्क वेबवर ठेवला होता. त्यासाठी ते ३ हजार डॉलर्सची मागणी करत आहेत. डेटासेटमध्ये ८५ टक्के भारतीय युजर्सचा डेटा असू शकतो.

टॅग्स :Pan Cardपॅन कार्डAdhar Cardआधार कार्डtechnologyतंत्रज्ञान