शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
4
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
5
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
6
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
7
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
8
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
9
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
10
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
11
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
12
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
13
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
14
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
15
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
16
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
17
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
18
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
19
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

देशाला सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टची नव्हे, तर आरोग्य सुविधांची गरज; ६९ माजी नोकरशहांचं मोदींना पत्र

By कुणाल गवाणकर | Published: December 23, 2020 12:13 PM

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अनावश्यक; ६९ माजी नोकरशहांचं पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली: देशाला सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टची नव्हे, तर शिक्षण, आरोग्य सुविधांची आवश्यकता आहे. देशातील आरोग्य सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची जास्त गरज आहे. असं असताना सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टला प्राधान्य दिलं जात आहे. यातून सरकारचा बेजबाबदारपणा दिसतो, अशा शब्दांत ६९ निवृत्त नोकरशहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी उभारण्याकडे लक्ष देण्याची गरज असताना सेंट्रल व्हिस्टासारख्या अनावश्यक प्रकल्पाला का प्राधान्य दिलं जातंय, असा सवाल निवृत्त नोकरशहांनी उपस्थित केला आहे.पंतप्रधान मोदींना लिहिण्यात आलेल्या पत्रावर माजी आयएएस अधिकारी जवाहर सरकार, जावेद उस्मानी, एन. सी. सक्सेना, अरूणा रॉय, हर्ष मंदर आणि राहुल खुल्लर यांच्यासह माजी आयपीएस अधिकारी ए. एस. दुलत, अमिताभ माथूर आणि जुलियो रिबेरो यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 'नवीन संसद भवन उभारण्यामागे विशेष असं कोणतंही कारण नाही. तशी कोणतीही निकड नाही. मात्र तरीही देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असताना, त्यामुळे लाखो लोकांना समस्यांचा सामना करावा लागत असताना नव्या संसद भवनावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे,' असं निवृत्त नोकरशहांनी पत्रात म्हटलं आहे.नवी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या अंतर्गत संसदेचा नवा परिसर, केंद्रीय मंत्रालयांसाठी सरकारी इमारती, उपराष्ट्रपतींसाठी नवा एनक्लेव्ह, पंतप्रधानांसाठी कार्यालय आणि निवासस्थान यांच्यासह अन्य वास्तूंची उभारणी केली जाणार आहे. यासाठी आधी ११ हजार ७९४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र आता तो वाढून १३ हजार ४५० कोटींवर गेला आहे. या खर्चाबद्दल माजी अधिकाऱ्यांनी मोदींकडे नाराजी व्यक्त केली आहे. 'सरकारचे प्रमुख म्हणून तुम्ही केंद्रीय व्हिस्टा प्रकल्पाच्या बाबतीत कायद्याचा अनादर केला आहे. या प्रकल्पासंदर्भात आधीपासूनच सरकारचं धोरण बेजबाबदारपणाचं होतं. कदाचित याआधी कधीही असा प्रकार घडला नसेल,' असं माजी नोकरशहांनी पत्रात नमूद केलं आहे. देशाला आरोग्य सुविधांची गरज असताना, त्यात जास्त गुंतवणूक होणं अपेक्षित असताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर नाहक खर्च केला जात असल्याबद्दल पत्रातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी