शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

सर्व दूरसंचार कंपन्यांना केंद्र सरकारचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:34 IST

स्पेक्ट्रम शुल्क दोन वर्षे न भरण्याची दिली मुभा

नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्यांना आता पुढील दोन वर्षे स्पेक्ट्रम शुल्काची रक्कम भरली नाही, तरी चालू शकेल. अशी सवलत देण्याचा निर्णय बुधवारी रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून, कर्जाच्या बोज्याखाली असलेल्या कंपन्यांना हा मोठा दिलासा आहे. व्होडाफोन-आयडिया, एअरटेल व रिलायन्स जिओ आदी कंपन्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. या निर्णयामुळे कंपन्यांना लगेचच ४२ हजार कोटी सरकारकडे जमा करावे लागणार नाहीत.सध्या सर्वच दूरसंचार कंपन्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल व जिओ यांच्यावरील कर्जच ३.९ लाख कोटी रुपयांचे आहे. त्यातच या कंपन्यांना अ‍ॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूचे (एजीआर) ९३ हजार कोटी दूरसंचार खात्याकडे जमा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याआधारे दूरसंचार खात्याने सर्व दूरसंचार कंपन्यांना पत्रेही पाठवली आहेत. या पार्श्वभूमीवर या कंपन्यांनी स्पेक्ट्रम शुल्काची रक्कम दोन वर्षांत भरली नाही, तरी चालेल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.सर्व कंपन्यांनी तशी मागणी सरकारकडे केली होती. दोन वर्षे या शुल्कातून सवलत मिळाली असली तरी त्यावरील व्याज कंपन्यांना भरावे लागणार आहे. दूरसंचार कंपन्यांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने सचिव समिती नेमली होती. त्यात कॅबिनेट सचिवांखेरीज दूरसंचार, महसूल, अर्थ तसेच निती आयोगाचे सदस्यही होते. त्यांनी स्पेक्ट्रम शुल्क भरण्यास मुदतवाढ देण्याची शिफारस केली होती, असे सांगण्यात येते.दोन वर्षांत होणार विलीनीकरणजिओने आपल्या नेटवर्कवरून अन्य नेटवर्क केलेल्या नियमित व्हॉइस कॉलसाठी सहा पैसे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्जाच्या बोज्याखाली असलेल्या बीएसएनएल या सरकारी कंपनीने मात्र याउलट निर्णय घेतला. त्यांनी व्हॉइस कॉल केल्यास ग्राहकाला सहा पैशांची कॅशबॅक योजना जाहीर केली.आता बीएसएनएलने एसएमएससाठीही ती घोषित केली आहे. ती ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल, असे सांगण्यात आले असले तरी बीएसएनएल ही योजना दरवाढीनंतर सुरू ठेवेल का, याविषयी शंका आहे. बीएसएनएल व एमटीएनएल या कंपन्यांचे विलीनीकरण दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.दूरसंचार कंपन्यांमध्ये दरयुद्धगेल्या काही काळापासून दूरसंचार कंपन्यांमध्ये दरयुद्ध सुरू आहे. जिओने आपल्या ग्राहकांना असंख्य सवलती दिल्या. त्यामुळे आपले ग्राहक त्या कंपनीकडे वळू नयेत, म्हणून अन्य कंपन्यांनीही जिओचे अनुकरण केले. परिणामी साऱ्याच कंपन्या तोट्यात गेल्या. आता सर्व कंपन्यांनी डिसेंबरपासून दरवाढ करण्याचे ठरविले असून, जिओ व बीएसएनएल यांनीही दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनJioजिओIdeaआयडियाAirtelएअरटेल