शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

300 काेटी लाच प्रकरणी केंद्र सरकारची अडचण, करणार का चाैकशी? राम माधव आणि सत्यपाल मलिक यांच्यात वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 05:41 IST

bribery case : मलिक यांनी दाेन वर्षांनी हे प्रकरण उकरून का काढले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात झाल्यानंतर मलिक यांची २०१९ मध्ये गाेव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हाेती. 

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव आणि मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने केंद्र सरकारची गाेची झाली आहे. मलिक यांना राम माधव आणि मुंबईतील एका कंपनीच्या सूचनेनुसार ३०० काेटी रुपयांची लाच देऊ केल्याचा आराेप हाेत आहे. मात्र,  या प्रकरणाच्या चाैकशीचे आदेश कसे द्यावे, अशा कात्रीत सरकार अडकले आहे.संबंधित प्रकरण हे दाेन वर्षे जुने आहे. मलिक हे जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल हाेते. त्यावेळी त्यांना दाेन कंत्राट मंजूर करण्यासाठी ३०० काेटींची लाच देऊ केल्याचा उल्लेख त्यांनी राजस्थानातील एका कार्यक्रमात नुकताच केला हाेता. ऑफर देण्यामागे राज्य सरकारच्या दाेन सचिवांनी राम माधव आणि एका उद्याेगपतीचे नाव घेतले हाेते. या प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी राम माधव यांनी केलीआहे. मलिक यांनी दाेन वर्षांनी हे प्रकरण उकरून का काढले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात झाल्यानंतर मलिक यांची २०१९ मध्ये गाेव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हाेती. मात्र, लगेचच त्यांना मेघालय येथे पाठविण्यात आले. राम माधव हे त्यावेळी भाजपचे सरचिटणीस आणि जम्मू आणि काश्मीरचे प्रभारी हाेते. त्यांनाही ईशान्येकडे पाठविण्यात आले. मात्र, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांच्यासाेबत त्यांचा वाद झाला. त्यामुळे माधव यांची पुन्हा आरएसएसमध्ये रवानगी झाली. तेथे त्यांना अद्याप काेणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. या प्रकरणामुळे आरएसएसमध्येही माधव यांचे वजन कमी झाल्याचे बाेलले जात आहे. 

प्रकरण आताच का?मलिक यांनी दाेन वर्षांनी हे प्रकरण उकरून का काढले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सत्यपाल मलिक यांची २०१९ मध्ये गाेव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हाेती. 

केंद्रापुढे पेच-    केंद्र सरकारची मात्र या वादामुळे गाेची झाली आहे. मलिक यांनी चाैकशीची मागणी केलेली नाही. मात्र, राम माधव यांनी चाैकशीची मागणी केली आहे. -    पंतप्रधान नरेंद्र माेदींचा उल्लेख करून संबंधित कंत्राट रद्द करण्याचा निर्णयावर ठाम राहावे, असे मलिक यांना सांगितले हाेते. त्यानुसार मलिक यांनी कारवाई केली हाेती.-    आता चाैकशी कशी करावी, असा प्रश्न केंद्र सरकारला पडला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर