शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

केंद्र सरकार गहाण टाकणार  6 लाख कोटींच्या मालमत्ता; अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 06:51 IST

अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा, रस्ते आणि रेल्वेवर योजनेमध्ये भर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना महामारीच्या फटक्यामुळे केंद्र सरकार आर्थ‍िक संकटाला तोंड देत आहे. वित्तीय तूट वाढत असून सरकारचा निर्गुंतवणुकीवर भर आहे. सरकारचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार रेल्वे, ऊर्जा, रस्ते इत्यादी क्षेत्रांमधील महत्त्वाच्या मालमत्ता खासगी क्षेत्रांना वापरण्यास देणार आहे. त्यातून तब्बल ६ लाख कोटी रुपये प्राप्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या २०२२ ते २०२५ या काळात एनएमपी योजना राबविली जाईल.

याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अधिकृत घोषणा केली. ‘राष्ट्रीय रोखीकरण पाइपलाइन’ (एनएमपी) योजनेअंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या योजनेतून सरकारी मालमत्ता विकण्याचा घाट मोदी सरकारने घातल्याची टीका विरोधकांनी केली आहे. केंद्र सरकार या क्षेत्रांमध्ये पुढील ४ वर्षांमध्ये ही योजना राबविणार आहे.

महामार्ग आणि रेल्वेद्वारे सर्वाधिक उत्पन्नाची अपेक्षाराष्ट्रीय महामार्गांमधून १.६ लाख कोटी मिळतील, असा सरकारला अंदाज आहे. सुमारे ४०० रेल्वे स्थानके, ९० रेल्वे गाड्या, कोकण रेल्वे, रेल्वेची मैदाने यातून १.२ लाख कोटी रुपये मिळण्याची सरकारला अपेक्षा आहे. याशिवाय दूरसचांर क्षेत्र, नैसर्गिक वायू, विमानतळे, राष्ट्रीय मैदाने, निवासी वसाहती इत्यादींचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

४३ लाख कोटींच्यामालमत्तांची यादी तयारnसार्वजनिक मालमत्तांच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली होती. n‘राष्ट्रीय रोखीकरण पाइपलाइन’ योजनेचे सूतोवाचही त्यांनी केले होते. नीती आयोगाने आता या योजनेचा पूर्ण आराखडा तयार केला आहे. या योजनेत एकूण ४३ लाख कोटींच्या मालमत्ता गहाण टाकण्यात येणार असून, आगामी ४ वर्षांत हे प्रमाण १४ टक्के राहणार आहे.n६ लाख कोटी रुपये मिळतील, इतक्या मालमत्तांची यादी सरकारने तयार केली आहे. त्यात रेल्वे, ऊर्जा, द्रुतगती महामार्ग, पॉवरग्रीड क्षेत्रातील मालमत्तांचा समावेश आहे. 

उद्देश काय?पायाभूत सुविधांचा विकास घडविणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी सरकार व खाजगी क्षेत्राची सांगड घालण्यात येत आहे. विकास ध्येये गाठून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे.

कोणत्या क्षेत्रातील प्रकल्पांचे रोखीकरण करायचे हे ठरविण्यात आले आहे. मालमत्तांची मालकी सरकारकडेच राहील. तसेच मालमत्ता सरकारला परत करणेही बंधनकारक राहील. या योजनेद्वारे मालमत्ता ठरावीक कालावधीसाठी सरकारच्या ताब्यातून मुक्त होतील. खासगी क्षेत्रांना त्या वापरण्यास दिल्यामुळे सरकारला त्यातून उत्पन्न प्राप्त होईल; तसेच सरकारवरील कर्जही कमी होण्यास मदत होण्याची सरकारला अपक्षा आहे. - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी