शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

खोट्या बातम्या देणाऱ्यांना सरकारचा 'दे धक्का', २ कोटी सबस्क्रायबर्स असलेले ८ चॅनेल बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 15:11 IST

Fake News : खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे.

नवी दिल्ली : खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. समाजात द्वेष पसवण्यासाठी कार्यरत असलेल्या आठ यूट्यूब चॅनेलला सरकारने मोठा धक्का दिला असून त्यांना ब्लॉक केले आहे. लोकसभा निवडणुका वेळेपूर्वी घेणे आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) बंदी यांसारख्या खोट्या बातम्या पसरवण्यात या वाहिन्यांचा मोठा सहभाग आढळून आला होता. याचीच दखल घेत सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. 

कारवाई करण्यात आलेल्यांपैकी अनेकांवर देशाच्या लष्कराबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप देखील आहे. संबंधित यूट्यूब चॅनेलचे व्हिडीओ तपासले असता या वाहिन्यांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) या वाहिन्यांवरील बनावट बातम्यांची सत्यता तपासली आहे. तसेच कारवाई करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेलचे दोन कोटींहून अधिक सदस्य अर्थात सबस्क्रायबर्स आहेत.  कारवाई करण्यात आलेले चॅनेल्स -

  1. यहां सच देखो (Yahan Sach Dekho)
  2. कॅपिटल टिव्ही (Capital TV)
  3. केपीएस न्यूज (KPS News)
  4. सरकारी व्लॉग (Sarkari Vlog)
  5. अर्न टेक इंडिया (Earn Tech India)
  6. एसपीएन9 न्यूज (SPN9 News)
  7. एज्युकेशनल दोस्त (Educational Dost)
  8. वर्ल्ड बेस्ट न्यूज (World Best News)

दरम्यान, खोट्या बातम्या पसरवून दिशाभूल करणाऱ्या चॅनेल्सबाबत सरकार खूप सतर्क झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाकडून सोशल मीडियावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. तरुण, विद्यार्थी, समाज आणि समाजाची दिशाभूल करणारा आणि भडकावणारा मजकूर देणार्‍या बातम्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही काही पहिलीच वेळ नाही, याआधी देखील सरकारने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनेल्सवर कडक कारवाई केली आहे.

टॅग्स :Fake Newsफेक न्यूजCentral Governmentकेंद्र सरकारYouTubeयु ट्यूब