शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

स्पेक्ट्रममुळे केंद्र सरकार मालामाल; ७७ हजार कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 06:31 IST

एअरटेलने ३५५.४५ मेगाहर्टझ व २३०० मेगाहर्टझ स्पेक्ट्रम खरेदी केले. त्यामुळे कंपनीकडे विविध बँडमध्ये सर्वाधिक स्पेक्ट्रम उपलब्ध झाले आहेत. याचा वापर ५जी सेवेसाठी होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाच वर्षांनी झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात केंद्र सरकार मालामाल झाले आहे. सरकारने स्पेक्ट्रम विकून ७७ हजार ८१४ कोटींची कमाई केली आहे. सर्वाधिक स्पेक्ट्रम रिलायन्स जिओने खरेदी केले आहेत. लिलावात ५जी स्पेक्ट्रम विक्रीसाठी उपलब्ध केले नव्हते.

८५५.६० मेगाहर्ट्झपर्यंत स्पेक्ट्रम दोन दिवसांत विकले गेले. जिओने सर्वाधिक ५७,१२२ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले. व्होडाफोन-आयडियाने १ हजार ९९३ कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली होती. भारती एअरटेलने १८ हजार ६९९ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम विकत घेतले. लिलावात ८००, ९००, १८००, २१०० व २३०० मेगाहर्ट्झ बँडसाठी बोली लावण्यात आली. मात्र, ७०० व २५०० मेगाहर्ट्झ बँडसाठी कोणीच बोली लावली नाही. गेल्या वेळी ७०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकले गेले नव्हते. यंदाही तसेच झाले. हा स्पेक्ट्रम ३.५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसोबत जोडला आहे. भविष्यात भारताला डिजिटल क्षेत्रातील आघाडीच्या देशांमध्ये समाविष्ट करण्यासाठी तो उपयोगी ठरू शकतो.  त्यामुळे या स्पेक्ट्रमसाठी सर्वाधिक आरक्षित मूल्य ठेवले होते.

गीगाहर्ट्झ बँडच्या खालील इतर स्पेक्ट्रम कमी किमतींत उपलब्ध आहेत. नव्या स्पेक्ट्रमसाठी बहुतांश ऑपरेटर्स इच्छुक दिसले नाहीत, कारण नव्या स्पेक्ट्रमसाठी उपकरणे अद्ययावत करावी लागतील आणि तो खर्च वाढेल. २२५० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी सोमवारी लिलाव सुरू झाले होते. त्याचे आरक्षित मूल्य चार लाख कोटी रुपये होते. सरकारी कंपन्यांचा सहभाग नाही.बीएसएनएल व एमटीएनएल यांचा लिलावात सहभाग नव्हता.  सरकारी स्पेक्ट्रमच्या लिलावात या कंपन्यांचे सहभागी होणे हितसंबंधांमध्ये अडथळा ठरले असते, असे सरकारचे म्हणणे आहे. 

५ जीसाठी वापर शक्यएअरटेलने ३५५.४५ मेगाहर्टझ व २३०० मेगाहर्टझ स्पेक्ट्रम खरेदी केले. त्यामुळे कंपनीकडे विविध बँडमध्ये सर्वाधिक स्पेक्ट्रम उपलब्ध झाले आहेत. याचा वापर ५जी सेवेसाठी होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.  

सर्वाधिक ‘जिओ’कडे स्पेक्ट्रम वाढविल्यामुळे डिजिटल सेवेचा विस्तार करण्यास मदत हाेणार आहे. तसेच अतिरिक्त स्पेक्ट्रममुळे ‘५जी’ सेवा देण्यासाठी सज्ज झाल्याचे रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्सकडे आता एकूण १७१७ मेगाहर्टझ स्पेक्ट्रम उपलब्ध झाले आहे.

४जी कव्हरेज सुधारण्यासाठी वापरव्होडाफोन-आयडियाने पाच सर्कलमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले. त्यांचा वापर ४जी कव्हरेजमध्ये सुधारणा करण्यासाठी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार