शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बीपीसीएलच्या विक्रीतून केंद्र सरकारला ९० हजार कोटी अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 05:54 IST

BPCL: सरकार केवळ समभागांच्या मूल्यांच्या आधारावर बीपीसीएलची किंमत ठरवील, असे कोणाला वाटत असेल, तर ते चूक आहे. सरकारला मालमत्तांचे मूल्यही विचारात घ्यावे लागणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारत पेट्रोलियम कॉर्प. लि. च्या (बीपीसीएल) विक्रीतून केंद्र सरकारला ९० हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत. कंपनीच्या समभागांच्या मूल्यांच्या तुलनेत ही रक्कम जवळपास दुप्पट आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बीपीएलमधील आपली ५२.९८ टक्के हिस्सेदारीची किंमत ठरविताना सरकारने कंपनीच्या मालमत्तांचे मूल्यही हिशेबात धरले आहे. त्यामुळे अपेक्षित रक्कम दुप्पट झाली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार केवळ समभागांच्या मूल्यांच्या आधारावर बीपीसीएलची किंमत ठरवील, असे कोणाला वाटत असेल, तर ते चूक आहे. सरकारला मालमत्तांचे मूल्यही विचारात घ्यावे लागणारआहे. 

त्यानुसार बीपीसीएलच्या विक्रीतून सरकारला किमान ९० हजार कोटी रुपये मिळायला हवेत. बीपीसीएलच्या मालमत्ता इतक्या मोठ्या आहेत, की त्यांच्या विक्रीतूनच ४५ हजार कोटी रुपये सहज मिळतील तसेच त्याचा बीपीसीएलच्या मुख्य व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. बीपीएल विकत घेण्यात वेदांता समूहाने रस दाखविला आहे. याशिवाय अपोलो ग्लोबल आणि आय स्क्वेअर कॅपिटल या दोन अमेरिकी निधी संस्थाही अधिग्रहणास उत्सुक आहेत. बीपीसीएलच्या खाजगीकरणाची प्रक्रिया गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग पार पाडीत आहे. डेलाॅईट टाऊच तोहमत्सू इंडिया ही संस्था सल्लागार म्हणून काम पाहत आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार