शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची बल्लेबल्ले! महागाई भत्त्यात वाढ, आकडा बघाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 23:18 IST

महागाईवरून केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना डीए देते. ही एकप्रकारची भेटच असते. बेसिक आणि डीएचा आकडा पहाल तर तुमच्या लक्षात येईल.

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सरसकट कर्मचारी नसून सेंट्रल पब्लिक एंटरप्रायझेसच्या (CPEs) कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. महागाईवरून केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना डीए देते. ही एकप्रकारची भेटच असते. हा डीए वाढीचा निर्णय जुलै २०२३ पासून लागू होणार आहे.

सार्वजनिक उपक्रम कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये ही वाढ 1992 च्या आयडीए पॅटर्नच्या आधारे करण्यात आली आहे, असे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे. नव्या वाढीनंतर 3,500 रुपये प्रति महिना मूळ पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 701.9 टक्के म्हणजेच 15,428 रुपये असेल. दुसरीकडे, 3,501 ते 6,500 रुपये मासिक पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी डीए 526.4 टक्के असेल, जो किमान 24,567 रुपये असणार आहे. 

6,500 रुपयांपेक्षा जास्त आणि 9,500 रुपयांपर्यंत मूळ वेतन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 421.1 टक्के डीए असेल, जो किमान 34,216 रुपये असेल. 9500 पेक्षा जास्त मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 351 टक्के असेल, जो किमान 40,005 रुपये असेल. 

हे देखील लक्षात घ्या...कर्मचार्‍यांच्या पगारातील महागाई भत्त्याची रक्कम 50 पैशांच्या वर गेल्यास, तो 1 रुपया मानला जातो. जर ही रक्कम 50 पैशांनी कमी झाली तर ती शून्य म्हणून गणली जाते. डीए 150.75 रुपये असेल तर ते 151 रुपये मानले जातात. 150.45 रुपये असेल तर ते 150 रुपये मानले जातात.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार