शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
14
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
15
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
16
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
17
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
18
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
19
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
20
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 09:06 IST

या रजांव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्व-निर्धारित सुट्ट्या मिळत राहतील ज्यासाठी ते पात्र आहेत असं त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचारी यापुढे वयोवृद्ध आई वडिलांच्या देखभालीसाठी ३० दिवसांची अतिरिक्त सुट्टी घेऊ शकतो. ही तरतूद इतर व्यक्तिगत कारणांसाठीही असू शकते अशी माहिती केंद्रीय कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी सुट्टी घेण्याची तरतूद आहे का असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला होता. त्यावर कामगार मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले. 

या प्रश्नावर कामगार राज्यमंत्र्‍यांनी लेखी उत्तर दिले. त्यात म्हटले की, सेंट्रल सिविल सर्विसेज लीव कायदा १९७२ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३० दिवसांची अर्जित रजा मिळू शकते. याशिवाय दरवर्षी २० दिवसांची अर्धवेतन रजा, ८ दिवसांची प्रासंगिक रजा आणि दोन दिवसांची मर्यादित रजा देण्याची तरतूद आहे. या रजांव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्व-निर्धारित सुट्ट्या मिळत राहतील ज्यासाठी ते पात्र आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच केंद्र सरकारमध्ये रिक्त पदांची भरती ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, जी विविध विभाग आणि मंत्रालयांच्या गरजांवर अवलंबून असते. १ मार्च २०२१ रोजी केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये एकूण मंजूर पदांची संख्या ४०,३५,२०३ होती. जितेंद्र सिंह यांना सरकारी विभागांमध्ये विशेषतः रेल्वे, संरक्षण, गृह मंत्रालय आणि टपाल विभागातील एकूण मंजूर पदे आणि रिक्त पदांचा डेटा देण्यास सांगितले होते त्यावर मंत्र्‍यांनी हे उत्तर दिले.  

ऑर्गन डोनेशनसाठी ४२ दिवसांची विशेष सुट्टी

केंद्र सरकारने याआधी अवयव दानाला प्रोत्साहन देण्यासाठी पाऊल उचलले होते. त्यात ऑर्गन डोनेशन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांपर्यंत प्रासंगिक रजा दिली जाईल असं म्हटले होते. इतकेच नाही तर ही सुट्टी डॉक्टरांच्या शिफारशीवर ऑपरेशनच्या एक आठवड्यापूर्वीपासून रिकवरीपर्यंत मिळते. 

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात प्रमुख सुविधा

केंद्र सरकार आरोग्य योजनेतून सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला स्वस्त दरात उपचार, औषधे आणि वैद्यकीय सेवा मिळते. निवृत्तिनंतरही सीजीएचएस सुविधेचा लाभ घेता येतो. महिलांना ६ महिने मॅटरनिटी लीव आणि पुरुषांना १५ दिवस पॅटरनिटी लीव दिली जाते. गंभीर आजार अथवा दुर्घटनेच्या परिस्थितीत दीर्घ कालीन मेडिकल रजेची सुविधा मिळते. निवृत्तीनंतर पेन्शन, ग्रॅच्युटी, पीएफ सुविधा. नवीन पेन्शन योजनेतून दरमहिन्याला पगारातून काही पैसे कापले जातात ते पेन्शन म्हणून दिले जातात. कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप, शिक्षण भत्ता दिला जातो. केंद्रीय विद्यालयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आणि गॅजेटेड हॉलिडेशिवाय अनेक विशेष सुट्ट्या दिल्या जातात. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार