शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉस बॉर्डर फायरिंगमधल्या नुकसानाची केंद्र सरकार करणार भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 17:52 IST

सीमेपलीकडून होणा-या पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झालेल्यांची केंद्र सरकार भरपाई करणार आहे. जम्मू-काश्मीर सरकारच्या माध्यमातून ही नुकसानभरपाई करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.

जम्मू-काश्मीर- सीमेपलीकडून होणा-या पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झालेल्यांची केंद्र सरकार भरपाई करणार आहे. जम्मू-काश्मीर सरकारच्या माध्यमातून ही नुकसानभरपाई करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. सीमेपलीकडून होणा-या गोळीबारात अनेकांना नुकसान सोसावं लागतं. अशा लोकांना आता केंद्र सरकार जम्मू-काश्मीर सरकारच्या सहाय्यानं नुकसानभरपाई देणार आहे.गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमकी सुरू असतात. क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये स्थानिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करावा लागतो. ब-याचदा या गोळीबारात नागरिकांना जीवही गमवावा लागतो. काही तासांपूर्वीच पुलवामा जिल्ह्यात महिलेच्या वेशात आलेल्या एका दहशतवाद्यानं पोलीस कॉन्स्टेबलवर ग्रेनेड हल्ला केला. परंतु या हल्ल्यात तो स्वतःच शिकार झाला असून, पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. पोलीस कर्मचा-याला स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.काश्मीर घाटीमध्ये सध्या 30 ते 40 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. लीपा घाटी, मंडल, रामपूर आणि इतर ठिकाणी हे दहशतवादी 30 ते 40च्या संख्येत असून, ते समूहानं राहत आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर जेव्हा गोळीबार करण्यात येतो, त्यावेळीच हे दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. कुपवाडा आणि तंगधारमध्ये अशाच प्रकारे दहशतवादी घुसले होते. पाकिस्तानकडून होणा-या गोळीबारात भारतातल्या सीमेवरच्या लोकांना मोठ्या प्रमाणात वित्तहानीचा सामना करावा लागतो. गेल्या काही तासांपूर्वीच सुरक्षा दलातील जवानांनी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात काही दहशतवाद्यांना घेराव घातल्याची माहिती समोर आली होती. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (26 फेब्रुवारी) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास जवानांनी बांदीपोराच्या हाजिन परिसरात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारदेखील केला. यावेळी जवानांनीही दहशतवाद्यांच्या गोळीबारला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह