शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस; ७ ते १८ हजार रुपये मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 06:31 IST

निमलष्करी व सशस्त्र दलांनाही लाभ

नवी दिल्ली : केंद्र सरकार आपल्या अराजपत्रित (नॉन गॅझेटेड) कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस देणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिवाळीत ७ हजार ते १८ हजार रुपयांपर्यंत लाभ होईल. सूत्रांनी सांगितले की, उत्पादकतेशी निगडित बोनस आणि बिगर-उत्पादकता निगडित बोनस अशा दोन प्रकारांत हा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. रेल्वे आणि टपाल विभागाचे कर्मचारी वगळता इतर विभागाच्या सर्व ग्रुप सी आणि ग्रुप बीच्या नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या वेतनाएवढा बिगर-उत्पादकता बंधित बोनस दिला जाईल. यालाच तदर्थ बोनस म्हटले जाते. यात जास्तीत जास्त सात हजार रुपये कर्मचाऱ्यास मिळतील. असाच बोनस केंद्रीय निमलष्करी दले आणि सशस्त्र दलांच्या कर्मचाऱ्यांनाही मिळेल. २०२०-२१ मध्ये किमान सहा महिने सेवा करणारे कर्मचारी तदर्थ बोनससाठी पात्र ठरतील. तीन वर्षांपासून काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांनाही तदर्थ बोनस मिळेल. वर्षात किमान २४० दिवस काम करणारे हंगामी कर्मचारी बोनससाठी पात्र असतील.रेल्वे, पोस्ट कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभरेल्वे आणि डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांना उत्पादकता बंधित बोनस दिला जाईल. रेल्वेच्या ११.५६ लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना सर्वाधिक ७८ दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मिळेल. प्रत्येक कर्मचाऱ्यास जवळपास १७,९५० रुपये बोनसपोटी मिळतील. डाक विभागाच्या पात्र कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या वेतनाएवढा बोनस दिला जाईल. डाक विभागाने १२० दिवसांचा बोनस देण्याची शिफारस केली होती. तथापि, वित्त मंत्रालयाने ती अस्वीकृत करून ६० दिवसांचा बोनस मंजूर केला. ग्रामीड डाक सेवक, हंगामी कामगार, ग्रुप बीचे नॉन गॅझेटेड अधिकारी, एमटीएस आणि ग्रुप सीचे कर्मचारी बोनससाठी पात्र असतील.