शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएच्या मंत्र्याला दिली कोट्यवधींची लाच,  एअर एशियाविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:38 IST

आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा परवाना मिळवण्यासाठी सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि मंत्र्यांना कथित स्वरूपात लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने एअर एशियाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. 

नवी दिल्ली - खासगी विमान कंपनी एअर एशियाविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा परवाना मिळवण्यासाठी सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि मंत्र्यांना कथित स्वरूपात लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने एअर एशियाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयकडून एअर एशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मंगळवारी एक खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचा परवाना मिळवण्यासाठी यूपीए सरकारसोबत मिळून कारस्थान रचत निरमांमध्ये बदल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार यूपीए-2 सरकारच्या कार्यकाळात एअर एशियाकडून तत्कालीन हवाई वाहतूक मंत्र्यांना तब्बल 50 लाख डॉलर एवढी लाच देण्यात आली होती. मात्र एअर एशियाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.  दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित धागेदोरे मिळवण्यासाठी सीबीआयने बुधवारी एअर एशियाच्या दिल्ली,  मुंबई, बंगळुरू या शहरातील कार्यालयांवर धाडी टाकल्या. या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांचे ईमेल, लाच आणि सरकारी नोट्स सीबीआयसाठी महत्त्वपूर्ण पुरावा ठरू शकतात. मात्र एअर एशियाकडून या आरोपांचे खंडन करण्यात येत आहे. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या एक महिना आधी हा कट रचण्यात आला. हे प्रकरण अन्य बाबींबरोबरच एअर एशिय आणि टाटा ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेवर आधारित आहे. तसेच  यूपीएच्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान  हवाई वाहतूक मंत्र्यांना करोडो रुपयांची लाच देण्यात आल्याचाही आरोप करण्यात येत आहे.  

टॅग्स :air asiaएअर एशियाairplaneविमानCorruptionभ्रष्टाचार