ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, १५ - स्टेट बँकेच्या पाच संलग्न बँकांच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारने आज मंजुरी दिली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचा समावेश आहे.सरकारच्या या निर्णयानंतर शेअर बाजारात स्टेट बँक आणि संलग्न बँकांच्या समभागांच्या किमतीत २० टक्क्यांपर्यंतची वाढ पाहायला मिळाली. विलीनीकरणाची ही प्रक्रिया मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे.
स्टेट बँकेच्या संलग्न बँकांच्या विलीनीकरणाला केंद्राची मंजुरी
By admin | Updated: June 15, 2016 19:34 IST