शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जुन्या पेन्शनबाबत केंद्राचं महत्त्वाचं पाऊल, कर्मचाऱ्यांना वन टाईम पर्याय देण्याची राज्यांना दिली सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 10:41 IST

Old Pension Scheme: गेल्या काही काळापासून कळीचा मुद्दा ठरलेल्या जुन्या पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारांनी अखिल भारतीय सेवेतील व्यक्तींना जुन्या पेन्शनबाबत एक वेळचा पर्याय द्यावा, अशी सूचना केंद्र सरकराने दिली आहे.

गेल्या काही काळापासून कळीचा मुद्दा ठरलेल्या जुन्या पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारांनी अखिल भारतीय सेवेतील व्यक्तींना जुन्या पेन्शनबाबत एक वेळचा (वन टाईम) पर्याय द्यावा, अशी सूचना केंद्र सरकराने दिली आहे. नॅशनल पेन्शन स्कीम २२ डिसेंबर २०२३ च्या अंमलबजावणीच्या अधिसूचनेपूर्वी रिक्त जागेत सामील झालेल्या आणि १ जानेवारी २००४ रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत सामील झाल्यावर नॅशनल पेमेंट्स स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेमध्ये सामावून घेण्यात येणार आहेत. या योजनेत सहभागी होऊ इच्छित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत एकदा मिळणाऱ्या या पर्यायाचा लाभ घेता येणार आहे. 

पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना ३१ जानेवारी २०२४ पर्यंत जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याबाबतचे आदेश हे देण्यात येतील. तसेच त्यानंतर त्यांची नॅशनल पेन्शन स्किममधील खाती ही ३१ मार्च २०२४ पर्यंत बंद केली जातील.

याबाबत कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व मुख्य सचिवांना १३ जुलै रोजी एक पत्र लिहिण्यात आलं आहे. त्या पत्रात लिहिलं आहे की, ज्या एआयएस अधिकाऱ्यांची एखाद्या पदावर किंवा रिक्त पदावरील नियुक्ती एनपीएसच्या अधिसूचनेची जाहिरात प्रसिद्ध झालेल्या २२ डिसेंबर २००३ नुसार झालेली असेल आणि १ जानेवारी २००४ रोजी किंवा त्यानंतर एनपीएसअंतर्गत सेवेत समाविष्ट झाले असतील, अशांना जुन्या पेन्शन योजनेतील तरतुदींअंतर्गत समाविष्ट होण्यासाठी वन टाईम पर्याय मंजूर केला जाईल. 

तसेच नागरी सेवा परीक्षा, २००३, नागरी सेवा परीक्षा, २००४, आणि भारतीय वन सेवा परीक्षा, २००३ द्वारे निवडलेले अखिल भारतीय सेवेतील कर्मचारीही या तरतुदींतर्गत समाविष्ट होण्यास पात्र आहेत, असेही पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेसने गेल्या काही काळापासून जुन्या पेन्शनबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. तसेच राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या काँग्रेसशासित राज्यांमधील सरकारांनी यापूर्वीच जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.तसेच कर्नाटकातही विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जुनी पेन्शन हा महत्त्वाचा मुद्दा बनवला होता. आणि सत्तेत आल्यास मध्य प्रदेशातही जुनी पेन्शन लागू करण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनCentral Governmentकेंद्र सरकार