शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पाचव्या मजल्यावरून कोसळल्याने सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू प्रतापनगरातील घटना : बांधकामासाठी कॉलम उभारत असताना अचानक गेला तोल

By admin | Updated: August 31, 2016 21:44 IST

जळगाव : बांधकामासाठी कॉलम उभारत असताना अचानक तोल गेल्यामुळे पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास प्रतापनगरातील ॲँग्लो उर्दू हायस्कूलसमोर सुरू असलेल्या दवाखान्याच्या बांधकामाच्या ठिकाणी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : बांधकामासाठी कॉलम उभारत असताना अचानक तोल गेल्यामुळे पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास प्रतापनगरातील ॲँग्लो उर्दू हायस्कूलसमोर सुरू असलेल्या दवाखान्याच्या बांधकामाच्या ठिकाणी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष दौलत विसपुते (वय ४२, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मृत्यू झालेल्या सेंट्रिंग कामगाराचे नाव आहे. संतोष विसपुते हे अनेक वर्षांपासून सेंट्रिंग कामगार म्हणून काम करत होते. त्यांची आर्थिक परिस्थितीची बेताची असून हातमजुरीतून येणार्‍या उत्पन्नावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना दोन मुली असून त्या विवाहित आहेत. त्यांना मुलगा नाही. रामेश्वर कॉलनीत ते पत्नीसह वास्तव्याला होते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ते गुलाब हटकर नावाच्या बांधकाम ठेकेदाराकडे कामाला होते. डॉ.रजनी नारखेडे यांच्या दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम याच ठेकेदाराच्या कामगार व मजुरांकडून सुरू आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे विसपुते हे सहकार्‍यांसोबत कामावर आले होते.
कॉलमच्या वजनामुळे गेला तोल
इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कॉलम उभारणीचे काम सुरू होते. याठिकाणी विसपुते यांच्यासोबत जगन्नाथ बाविस्कर, भानुदास घुगे, सखाराम घुगे हे त्यांचे सहकारी कॉलम उभारणी करत होते. लोखंडी सळईचा कॉलम विसपुते यांनी पकडलेला होता. त्यांचे सहकारी कॉलमला लावल्या जाणार्‍या लाकडी पाट्या घेण्यासाठी बाजूला झाले. तेव्हा कॉलमचे वजन अधिक असल्याने त्यांचा एका बाजूला तोल जाऊन ते खाली कोसळले. पाचव्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कामावर असलेल्या त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना लागलीच जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांना अतिदक्षता विभागात व्हॅँटिलेटरवरही ठेवण्यात आले. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. नंतर त्यांना मृतावस्थेत जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
घराचा खांबच खचला...
या घटनेची माहिती झाल्यानंतर विसपुते यांचे जोशी कॉलनीत राहणारे जावई अजय दुसाने व इतर नातेवाईक, मित्र परिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. विसपुते हे घरात एकटे कमावते होते. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. या घटनेमुळे रामेश्वर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.