शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना बजावलेल्या नोटिसीचा तपशील उघड करण्यास केंद्राचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 06:14 IST

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल भाजपचे खा. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. या प्रकरणी राहुल यांना एप्रिल महिन्यात नोटीस बजावण्यात आली.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वासंदर्भात तक्रार आल्यानंतर त्यांना बजावलेल्या नोटिसीतील माहिती उघड करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला आहे. तपासात अडथळे निर्माण होऊ शकेल अशी माहिती उघड करण्यास माहिती अधिकार कायद्यामध्ये प्रतिबंध करण्यात आला आहे असे कारण त्यासाठी गृहमंत्रालयाने पुढे केले आहे.

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल भाजपचे खा. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. या प्रकरणी राहुल यांना एप्रिल महिन्यात नोटीस बजावण्यात आली. या नोटिसीत नेमके काय म्हटले आहे याबद्दलचा तपशील माहिती अधिकाराखाली केलेल्या अर्जाद्वारे या मंत्रालयाकडे मागविण्यात आला होता. लंडन येथील बॅकॉप्स लिमिटेड या कंपनीचे राहुल गांधी संचालक आहेत. या कंपनीने १० ऑक्टोबर २००५ व ३१ ऑक्टोबर २००६ रोजी वार्षिक उत्पन्न अहवाल सादर केला. त्यात राहुल गांधी इंग्लंडचे नागरिक असल्याचेही नमूद केल्याचा हवाला देत डॉ. स्वामी यांनी चौकशीची मागणी केली होती.

हास्यास्पद प्रकार : प्रियांका गांधीडॉ. स्वामी यांच्या तक्रारीबाबत राहुल गांधी यांनी आपले म्हणणे सादर करावे, अशी नोटीस त्यांना गृहमंत्रालयाने बजावली होती. प्रियांका गांधी यांनी म्हटले होते की, राहुल यांचा जन्म व ते लहानाचे मोठे भारतातच झाले ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. तरीही त्यांना नोटीस पाठवणे हास्यास्पद आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाची सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१५मध्ये फेटाळली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी