शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांवरच ‘सेन्सॉर’ची गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 04:13 IST

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचे स्वातंत्र्य दिनानिमित्तचे भाषण मंगळवारी प्रसारित करण्यास दूरदर्शन आणि आकाशवाणीने नकार दिला.

नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचे स्वातंत्र्य दिनानिमित्तचे भाषण मंगळवारी प्रसारित करण्यास दूरदर्शनआणि आकाशवाणीने नकार दिला. त्यामुळे डाव्या आघाडीचे सरकार आणि प्रसार भारती यांच्यात संघर्ष उडाला आहे.प्रथेप्रमाणे स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्री भाषण करीत असतात. मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी भाषण ध्वनिमुद्रित केल्यानंतर प्रसार भारतीने त्यांना हे सहा मिनिटांचे भाषण ‘बदलून द्या’ असा सल्ला दिला. मंगळवारी सकाळी ६.३० वाजता सरकार यांचे भाषण प्रसारित होणार होते; पण सरकार यांनी भाषणात बदल करण्यास नकार दिल्यानंतर दूरदर्शन आणि आकाशवाणीने ते प्रसारितच केले नाही.प्रसार भारतीने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे पावित्र आणि गांभीर्य लक्षात घेऊन प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करून आणि दिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या सामूहिक निर्णयानंतर सध्याच्या स्वरूपातील भाषण प्रसारित न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आकाशवाणी/प्रसार भारतीला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाचे पावित्र्य आणि गांभीर्यता तसेच देशाच्या नागरिकांच्या भावनांना अनुरूप ठरतील, असे बदल भाषणात करून दिल्यास अधिक आनंद होईल.>काय होते भाषणात; का करण्यास सांगितले गेले बदल?विविधतेमध्ये एकता हा भारताचा परंपरागत वारसा आहे. धर्मनिरपेक्षतेच्या महान मूल्यांनी भारतीयांना एक देश म्हणून एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले आहे. आज याच तत्त्वावर हल्ला होत आहे. समाजात अनिष्ट अशी गुंतागुंत निर्माण करून फूट पाडण्यासाठी कटकारस्थाने आणि प्रयत्न सुरू आहेत.आमच्या देशाच्या जाणिवेवर धर्म, जात आणि समाज यांच्या भावनांना भडकावून भारताला विशिष्ट धर्मात रूपांतरित करण्यासाठी तसेच गायीच्या संरक्षणाचे नाव घेऊन हल्ले केले जात आहे, असे माणिक सरकार यांनी भाषणात म्हटले होते. यामध्येच बदल करण्यास त्यांना सांगण्यात आले.>हा विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याचा कटत्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे स्वातंत्र्य दिनानिमित्तचे भाषण प्रसारित न करून केंद्राने विरोधी पक्षांचे आवाज बंद करण्याचा प्रयत्न चालविला आहे. प्रसार माध्यमांवर ही सरकारच्या सेन्सॉरशिपची टांगती तलवार आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. ते म्हणाले की, स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध राज्यांत झालेले कार्यक्रम व तेथील मुख्यमंत्र्यांच्या भाषणांचा सारांश मंगळवारी दूरदर्शनवरून प्रक्षेपित करण्यात आला. त्यात केवळ भाजपा मुख्यमंत्र्यांचीच नावे घेतली. पश्चिम बंगालमधील स्वातंत्र्य दिनाचा त्यात उल्लेख नव्हता आणि ममता बॅनर्जी यांचे नावही घेण्यात आले नाही. देशात अघोषित सेन्सॉरशिप सुरू झाल्याचेच हे ढळढळीत उदाहरण आहे.