शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैय्याचा प्रचार करुन स्वराच्या 31 व्या 'बर्थ डे'चं सेलिब्रेशन, उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 14:17 IST

अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा आज 31 वा वाढदिवस आहे.

बेगूसराय - भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे लोकसभा उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी आज शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी घरातून निघताना आईचा आशीर्वाद घेऊन आणि दही साखर खाऊन कन्हैय्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी घर सोडले. कन्हैय्या यांच्या रॅलीत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी सहभाग घेतला आहे. तर, अभिनेत्री स्वरा भास्कर हिने कन्हैय्या कुमारसाठी प्रचार करत आपल्या बर्थ डे सेलिब्रेशनला सुरुवात केली. 

अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा आज 31 वा वाढदिवस आहे. आपल्या 31 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना स्वराने ना मित्रांसोबत पार्टी केली, ना मैत्रीणींसोबत आऊटींगला गेली. स्वराने बेगुसराय मतदारसंघातील कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या बर्थ डे सेलिब्रेशनला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी स्वरासह तिचे जवळचे मित्रही बेगुसरायमध्ये दाखल झाले आहेत. तर जेएनयुमधील विद्यार्थी संघटनेचे नेते आणि विद्यार्थीही कन्हैय्याच्या प्रचारासाठी हजर झाले आहेत. मला पार्टी करायला खूप आवडतं, पण आज मी दिवसभर फिरून कन्हैय्याचा प्रचार करणार आहे. त्यानंतर, प्रचार संपल्यानंतर रात्री माझ्या जवळच्या मित्रांसमवेत मी पार्टी करणार असल्याचेही स्वराने म्हटलं आहे.

दरम्यान, कन्हैय्याकुमार बेगूसराय मतदारसंघातून निवडणूक लढवत असून भाजपचे दिग्गज नेते गिरिराजसिंह यांचे कन्हैय्याला आव्हान असणार आहे. दरम्यान, कन्हैय्याकुमारने जनतेला आवाहन करुन आपल्या उमेदवारी आणि प्रचारासाठी निधी उभारला आहे. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारSwara Bhaskarस्वरा भास्करLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक